जामखेड प्रतिनिधी : १५ सप्टेंबर
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जांबवाडी येथील अनेक दिवसांपासून बेपत्ता आसलेल्या तरुणाचा मृतदेह काल दि. १४ सप्टेंबर रोजी शेतातील झाडाला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
जामखेड तालुक्यातील जांबवाडी तरुण संतोष नामदेव सागडे ( वय ३४ वर्षे), हा गुरुवार दि. ८ सप्टेंबर पासुन बेपत्ता झाला होता. या प्रकरणी मयत संतोष सागडे हरवला आसल्याची तक्रार देखील नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्या दृष्टीने पोलीस संतोषचा शोध घेत होते. तपासा दरम्यान काल बुधवार दि. १४ रोजी मयताचे नातेवाईक अशोक अप्पा तोडकर व त्यांचा मेव्हणा नवनाथ हे जुन्या जांबवाडी परीसरातील शेतात बैलं बांधण्यासाठी गेले असता, त्यांना शेतातील झुडपांच्या आत मध्ये संतोषचा मृतदेह लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. बरेच दिवस झाले असल्याने संतोष मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता .
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या नंतर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, कर्मचारी विजय कोळी, भागवत पालवे, सचिन पिरगळ यांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई राजु थोरात सह पो.हे.कॉ संजय लाटे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment