जामखेड प्रतिनिधी : १६ सप्टेंबर
जामखेड येथील कर्जत रोड ते सौताडा असे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम अवघ्या काही दिवसांतच सुरू होणार असून याची पुर्ण पुर्वतयारी झाली असल्याची माहिती या रस्त्याचे सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर विकी कांबळे यांनी दिली.
आढळगाव पासून कर्जत फाटा (कोठारी पेट्रोल पंप) इथपर्यंत सुरू असलेले काम येत्या चार-आठ दिवसांत सुरू होणार असून त्याची पुर्वतयारी पुर्ण झाली आहे. हा रस्ता जामखेड येथील कर्जत फाटा ते सौताडा गावाच्या पुढे साधारण दोन किलोमीटर पर्यंत होणार आहे. हा रस्ता शहरातून चार पदरी तर पुढे दोन पदरी असा असून विविध मान्यवरांच्या हस्ते कामाचे भुमीपुजन लवकरच होणार आहे. सद्या कामाची पुर्व तयारी सुरू असून शहरातील रस्त्याचीकडेचे अतिक्रमणधारक यांना नोटीस देण्यात आल्या आहेत तर जिथे काही अडचण नसेल हे आवघ्या काही दिवसातच सुरू होणार आहे. याबाबतची खात्रीलायक माहिती सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर विकी कांबळे यांनी दिली.
या रस्त्याचे काम व्हावे ही जामखेडकरांची अनेक वर्षांची मागणी आहे. तर अनेक अंदोलने व खड्ड्यांमुळे अनेक अपघातही या रस्त्यावर झाले आहेत. हे काम सुरू होत असल्याने जामखेडकर समाधान व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment