खर्डा प्रतिनिधी:१६ सप्टेंबर
खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोफत नेत्र शिबिरास व चष्मे वाटपास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल 467 लोकांची यावेळी तपासणी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की,आमदार रोहित पवार यांच्या सहकार्याने व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थांच्या माध्यमातून खर्डा येथे मोफत नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक गोरगरीब लोकांना मोफत शिबिराचा फायदा झाला आहे.
यामध्ये 467 लोकांच्या डोळ्यांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली, त्यापैकी 373 लोकांना नंबरचे चष्म्याचे लगेच वाटप करण्यात आले तर नॉर्मल असलेल्या लोकांची तपासणी करून प्रत्येकाला आयड्रॉप व औषधे देण्यात आली, त्याच बरोबर 65 लोकांना डोळ्याचे ऑपरेशन हे पुढील काळात मोफत करण्यात येणार आहे.
खर्डा शहरातील नागरिकांना या नेत्ररोग शिबिराच्या माध्यमातून मोफत चष्मे व औषधे देण्यात आल्याने नागरिकांचा मोठा आर्थिक फायदा सुद्धा या माध्यमातून झाला असून या शिबिराच्या प्रसंगी गरीब व गरजू लोकांनी आमदार रोहित पवार यांचे मनापासून आभार मानले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार,शाम सकट यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment