खर्डा प्रतिनिधी:16 सप्टेंबर
खर्डा शहराला गेली अनेक वर्षापासून मोहरी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे,तसेच जामखेड तालुक्यात सर्वात लवकर भरणारा तलाव म्हणून या तलावाकडे पाहिले जाते.दुष्काळी परिस्थितीत जामखेड तालुक्याला याच तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.खर्डा शहरापासून अवघ्या पाच की.मी.अंतरावर असणारा हा तलाव नैसरर्गिकदृष्टया डोंगर दऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.घाटमाथ्यावर सतत पडणाऱ्या पावसाने हा तलाव बहुतेक दरवर्षी पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग हा खैरी तलावाकडे झे, त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा खैरी मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोहरी तलावाच्या पाण्यावर जास्त अवलंबून असतो.
यावर्षी हा मोहरीचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून उसळून वाहत आहे या तलावाचे जलपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते व खर्डा येथील सिताराम गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्यामुळे खर्डे करांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
याप्रसंगी खर्ड्याचे सरपंच आसाराम गोपाळघरे,माजी सभापती सूर्यकांत मोरे, मोहरीचे उपसरपंच हनुमंत बारगजे, विजयसिंह गोलेकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, माजी सरपंच मंजरभाई सय्यद, हरिभाऊ गोलेकर, रामहरी गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, दादा जमकावळे, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात व मोहरीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment