जामखेड प्रतिनिधी :१४ ऑक्टोंबर
जामखेड तालुक्यातील दरडवाडी या ठीकाणी लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या एका बैलावर वीज पडुन त्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून जामखेड सह खर्डा परीसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याने आनेक नद्यांना पुर आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी आपली व आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यात मागील दोन दिवसापासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे आहे. त्यामुळे नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आले आहेत. आज शुक्रवार दि १४ रोजी जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील केकान वस्ती परीसरात शेतकरी बाबुराव अर्जुन केकाण हे आपली गुरे चारत होते. यावेळी त्यांचा एक बैल चारा खात चरत होता यावेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सदर बैल जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला थांबला आसताना दुपारी अचानक त्या बैलाच्या अंगावर वीज पडली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर ची घटना गावातील ग्रामस्थ बाबुराव अर्जुन केकाण यांनी आ. प्रा राम शिंदे यांना सांगितली या नंतर तातडीने सदरची माहिती आ. प्रा राम शिंदे यांनी प्रशासनास कळवली होती.
या नंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संजय राठोड यांना घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी त्यांचे सहकारी एस एस सुरवसे व पाचरणे यांना सोबत घेऊन घटनास्थळी बैलाचे शवविच्छेदन केले या मध्ये सदर बैलाच्या अंगावर वीज पडुन मृत्यू झाला आसल्याचे निदर्शनास आले. याबाबत मृत्यू झालेल्या बैलाच्या मालकास आपत्ती जनक मध्ये शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा