जामखेड प्रतिनिधी :१४ आॅक्टोबर
जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली उडीद, सोयाबीन, तुर, बाजरी, मका इत्यादी पिकांचे व सर्व फळबागा नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकांसाठी व फळबागांसाठी खुप खर्च केलेला आहे. व दिवस रात्र झटून पिके व्यवसस्थित आणली पण ऐनवेळी अतिवृष्टीमुळे सदर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी या पिकांसाठी केलेला खर्च देखील निघलेला नाही. यामुळे शेतकरी कर्ज बाजरी होत चालेले आहेत आणि याच कारणाने शेतकरी आत्महत्या करण्याची शक्यता आहे.
तरी सदर नुकसान झालेलया पिकांचे त्वरीत पंचनामे करण्यात यावेत व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार जामखेड यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सचिव राजेंद्र कोठारी, दक्षिण जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सदाशिव हजारे व तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे यांच्या सह्य़ा आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा