जामखेड प्रतिनिधी : १३ आॅक्टोबर
निवडणूक आयोगाकडून जामखेड तालुक्यातील माहे डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या रत्नापूर, राजुरी व शिऊर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या तिन्ही ग्रामपंचायत च्या प्रभागनिहाय मतदार आज दिनांक 13/10/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर मतदार याद्या गावातील लोकांना तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या मतदार याद्या बाबत कोणाला काही हरकत असल्यास आपण आपली हरकत दिनांक 13/10/2022 ते 18/10/2022 (दिनांक 16/10/2022 रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयात दाखल कराव्यात. या मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. अश्या सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिल्या आहेत.
जामखेड तालुक्यातील या तिन्ही ग्रामपंचायत राजकीय खुप महत्वाचे असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकांना खूप महत्त्व असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा