जामखेड प्रतिनिधी : ११ नोव्हेंबर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड शहर सरचिटणीसपदी संजय वारभोग उपाध्यक्षपदी अविनाश बोधले तर कोषाध्यक्षपदी दत्तात्रय राऊत यांची निवड करण्यात आली. संघाचे जामखेड शहराध्यक्ष फायकअली सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते शहर कार्यकारणी निवडण्यात आली. दि. ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड शहर शाखेची बैठक संपन्न झाली. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत या निवडी करण्यात आल्या तर संघाचे जामखेड शहराध्यक्ष फायकअली सय्यद यांच्यावतीने दिवाळी निमित्त उपस्थित सर्व सदस्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
दिं. ६ नोव्हेंबर रोजी जामखेड येथिल विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड शाखेच्या सभासदांची सर्व साधारण सभा संपन्न झाली. यावेळी पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली. कोषाध्यक्ष दैनिक गावकरी जामखेड तालुका प्रतिनिधी दत्तात्रय राऊत, सरचिटणीस संजय वारभोग, चिटणीस किरण रेडे, उपाध्यक्ष अविनाश बोधले, राजेश भोगील, व कार्यकारणी सदस्यपदी अजय अवसरे, श्वेता गायकवाड, अशोक वीर, सुदाम वराट, सत्तार शेख, पप्पूभाई सय्यद, हैदर सुभेदार, राजेंद्र भोगील, सुनील कासार, संतोष गर्जे, हरिभाऊ खंडागळे यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच हे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे व राज्य संघटक संजय भोकरे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या असून नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा