जामखेड प्रतिनधी:१६नोव्हेंबर
मतदारसंघातील पर्यटनवाढीसाठी आमदार रोहित पवार हे सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व प्रयत्न वेळोवेळी ते करत असल्याचेही पाहायला मिळते. अशातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रयत्न करून रेहेकुरी अभयारण्य व कुंभेफळ बर्ड पार्कसाठी मंजूर करून आणलेल्या पर्यटनविषयक विविध कामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य आणि कुंभेफळ बर्ड पार्कसाठी आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनस्तरावर वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून निसर्ग पर्यटन विकास योजनेंतर्गत १ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये एवढा निधी मंजूर करून आणला होता. त्यामध्ये सर्व सुविधानियुक्त विश्रामगृह, अत्याधुनिक स्वच्छतागृह, स्वागत कमान, तिकीट काउंटर, पर्यटकांना बसण्यासाठी बेंचेस, अंतर्गत रस्ते, वॉच टॉवर, पेगोंडा अशा विविध कामांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि परिणामी स्थानिक नागरिकांना देखील पर्यटनवाढीमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
दरम्यान, स्थानिक पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास आजूबाजूच्या परिसराचा देखील आपोआप विकास होत असतो आणि पर्यटन वाढल्यास आर्थिक उलाढालही वाढून संबंधित भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. यामुळे आता या रेहेकुरी अभयारण्य आणि कुंभेफळ बर्ड पार्क येथील विकास कामामुळे आणि अतिशय दुर्मिळ असणारे युरोपातील व दूरवरचे पक्षी इथे स्थलांतरित होत असल्याने त्याचा विकास झाल्यास पर्यटकांना देखील हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल यात शंका नाही.
चौकट
शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातुन मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा येईल आणि विकास कसा होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत आलो आहे. माझ्या मतदारसंघात वन परिक्षेत्र अधिक आहे त्याचा फायदा पर्यटनासाठी होऊन त्यातून मतदारसंघातील युवकांना रोजगाराची संधी मिळाली तर त्याचा नक्कीच मला आनंद होईल.
- आ. रोहित पवार ( कर्जत-जामखेड)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा