खर्डा प्रतिनधी : ८ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण येथे एका मोटारसायकलस्वराने दिलेल्या जोरदार धडकेत देवदैठण येथील ७५ वर्षीय वयोवृद्ध खंडेराव बापुराव भोरे यांचा मृत्यू झाला असून मोटारसायकल स्वार आपल्या मोटारसायकल सह फरार झाला आहे. हा अपघात दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०५ वाजताचे सुमारास देवदैठण गावाचे शिवारात घडला असून आरोपी अपघातानंतर पळून गेल्याने खर्डा पोलीसांनी केलेल्या तपासामुळे या अपघातील मोटारसायकल व अरोपीस निष्पन्न झाल्याने दि. ७ डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, फिर्याद नागनाथ खंडेराव भोरे यांचे वड़ील खंडेराव बापुराव भोरे (वय ७५) रा-देवदैठण हे सायकल वरून किराणा सामान घेवुन देवदैठण येथून नाहुलीकडे जाणा-या रस्त्याने सायकल हातात धरून परत येत असताना बणगेवस्ती जवळ ११:०५ वाजेच्या सुमारास नाहुली कड़ुन देवदैठण कडे येणा-या काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्पेलंडर मोटारसायकल नं-MH-16-3E-1016 ही वरील चालक बाबासाहेब अंकुश बहिर.रा-नाहुली याने मोटारसायकल भरधाव वेगात चालवुन समोरून हातात सायकल धरून येणारे खंडेराव बापुराव भोरे यांना समोरून दोन्हीं पायांचे मध्यभागी जोराची धडक देवुन गंभीर केले यामध्ये भोरे यांच्या त्यातच मृत्यू झाला तसेच त्यांच्या सायकलचेही नुकसान झाले व त्यांचे मृत्युस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता पळन गेला आहे. यानुसार फिर्यादी नागनाथ खंडेराव भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकलस्वार बाबासाहेब अंकुश बहिर. रा-नाहुली यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 304 (अ),279,337,338,427, मो.वा.का. कलम 134(अ) (ब), 184/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल आर.के.सय्यद हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा