खर्डा प्रतिनधी:७ डिसेंबर
खर्डा येथील मेनरोडवरील बाजार पेठेतील श्री. दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त खर्डा येथील अशोक विभूते व सौ. वंदना विभूते यांच्या हस्ते हा जन्मोत्सवाचा धार्मिक विधी पार पडला.
कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच झालेल्या या सोहळ्यासाठी खर्डा व परिसरातील भावीक-भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. दिंगाबंरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय घोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी भावीकांना शाबुदना खिचडी वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा