जामखेड प्रतिनिधी : २९ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील यातील फिर्याद शेतकरी बापुसाहेब वैजीनाथ चव्हाण (वय ४० वर्ष) यांच्या बोर्ले वस्ती येथील राहते घराच्या मुख्य दरवाजाचे व बेडरुमच्या दरवाजाचे कडी कोंयडा तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुम मधील लोंखडी शोकेसचे लाँकर मध्ये ठेवलेली १ लाख १५ हजार रुपये रोख व एक ५ ग्रँम वजनाची सोन्याची नथ जुनी फिर्यादीचे संमतीशिवाय स्वताचे आर्थीक फायद्याकरता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. ही घटना दि. २६ डिसेंबर रोजीच्या राञी ९ :०० वा. ते दि. २७ डिसेंबर रोजी चे राञी १ : ४५ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
सदर घटनेबाबत फिर्यादी बापुसाहेब वैजीनाथ चव्हाण (वय ४० वर्ष) धंदा-शेती रा-चव्हाण वस्ती, बोर्ले ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादवी कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment