खर्डा प्रतिनिधी : २९ डिसेंबर
आम्ही आजपर्यंत इमाने-इतबारे लहान मोठी कामे करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी यामुळे लहान वयात मुलांमुलींचे लग्न होत होते. यामुळे अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागत होता. समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन व शासनाच्या विविध योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी अनाथाचे नाथ गोरगरिबांचे कैवारी ॲड. अरूण जाधव यांनी प्रयत्न केले त्यामुळे आज समाज बदलत आहे. आम्ही लहान वयात मुलांमुलींचे लग्न करणार नाहीत तसेच मुलांना शिक्षण देणार असा निर्धार केला करत खर्डा येथील मदारी समाजाने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. अरूण जाधव यांचा उपस्थितीत व भारतीय संविधानाच्या साक्षीने एक अनोखा विवाह सोहळा संपन्न केला.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दि. २८ डिसेंबर २०२२ मदारी समाजातील १० वधूवरांनाचा सामूहिक विवाह संविधान प्रतिमेचे पूजन करून संपन्न करण्यात आला. महाराष्ट्रभर भटकंती करत असणाऱ्या मदारी समाजतील सामूहिक विवाह सोहळास गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांचे भटके-विमुक्तांचे नेते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव तसेच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील खर्डा गावातील प्रतिष्ठित नागरिक व मदारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात काच, पत्रा, प्लास्टिक, भंगार गोळा करून तसेच वाहनांना डिझाईन बनवणे अशा कामांमधून मिळणाऱ्या पैश्यातून कुटूबांची व चिल्यापिल्याची उपजिवीका भागवणे हा व्यवसाय करणारा असा हा ईमानदार मदारी बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विश्वासाने माळवा म्हणून प्रसिद्ध असणारे मदारी मेहतर यांचे वंशज्यांनी आज पासून ठरवले की, कमी वयात मुला मुलींचे लग्न करणार नाही. प्रत्येकाने मुलांना शिकवले पाहिजे असे ठरवले. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रशाकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रचारक विशाल (भाऊ) पवार, तुकाराम पवार, गणपत कराळे, शीतल पवार, दिपाली काळे, प्रमोद गंगावणे, कांतीलाल जाधव, गौरव बागडे, बिलाला मदारी करमाळा, सादिक मदारी टेंभूर्णी, फकीर मदारी बीड, राजू मदारी भिगवन, ईमाम मदारी बार्शी, अमीर मदारी परंडा, महेबुब पाट्स, सुलेमान अकलूज बीड, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर,अहमदनगर, अकलूज, मंगळवेढा, करमाळा, भूम, बार्शी, परंडा, जामखेड, पाटोदा, पाटस, टेंभूर्णी, पुणे, भिगवन, येथील मदारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी वधूवरांना आशीर्वाद संतोष चव्हाण सर, तुकाराम पवार, डॉ. नागरगोजे, वैजीनाथ लोंढे दिले सूत्रसंचान विशाल पवार यांनी केले.
No comments:
Post a Comment