जामखेड प्रतिनिधी : ७ डिसेंबर
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत जामखेड नळपाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेस मंजुरी म्हणजे जामखेड शहरातील ६० हजार लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. वाटलं तर जीआरचा कागद त्यांना द्या, पण मंजुरी द्या. अशी विनंती करत पन्नास वेळा चकरा माराव्या लागल्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. अन् आ. राम शिंदे यांनी आयत्या मंजुरीचा कागद आणला राजकीय श्रेयासाठी खोटं बोलण्याचा सपाटा लावला. खोटं बोलणं आपली संस्कृती नाही. विकासकामांना स्थगिती व खोटे बोलण्याची विचारसरणी जनतेने पचवून घेऊ नये असे आ. रोहित पवार यांनी आ. राम शिंदेंवर टीका करतांना सांगितले.
यबहुचर्चित महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत जामखेड नळपाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेस मंजुरी आणल्याबद्दल जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. रोहित पवार यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, मोहन पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सुरेश भोसले,
वैजीनाथ पोले, कल्लूभाई कूरेशी, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रा. कुंडल राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, विकी भाऊ सदाफुले, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, सचिन शिंदे, प्रकाश काळे, उमर कुरेशी, प्रविण उगले, महेश निमोणकर, निखिल घायतडक, अमोल लोहकरे, वसिम सय्यद (मंडप), पवन राळेभात, रमेश आजबे, अमित जाधव, नरेंद्र जाधव, अमर चाऊस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अमित जाधव यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, विरोधकांनी जे काम केलेच नाही तेसुद्धा चौकात लावलेल्या बोर्डवर लिहिले. त्यांनी मंत्री असताना मंत्रीपदाची ताकत जनतेच्या फायद्यासाठी नाही तर व्यक्तीगत फायद्यासाठी वापरली. मतदारसंघातील पोलीस प्रशिक्षण केंद्रासह अनेक कामे, प्रकल्प बाहेर घेऊन जाण्याची भाषा कॅबिनेट मध्ये भाजपाच्याच मंत्र्याकडून झाली. तेंव्हा कँबिनेटमध्ये असुनही विरोध करण्याची हिंमत आ. राम शिंदेंची झाली नाही. मी संबंधित मंत्री व प्रशासनाला विनंती केली की, कुसडगांव येथील एकमेव एसआरपी प्रशिक्षण केंद्र आहे की, जिथे भरती आणि केंद्राचे काम एकत्र चालू आहे. तसेच आवश्यक त्या तांत्रिक बाबी पटवून दिल्या. एसआरपी प्रशिक्षण केंद्र कुसडगावलाच ठेवण्यास सरकारला भाग पाडले. आणि आता विरोधक आयता कागद घेऊन खोटं बोलत आहेत. आहिल्यादेवींचे वंशज सांगता अन् चौंडीत कोट्यवधींच्या विकास कामांवर स्थगिती आणता? राजकीय श्रेयासाठीचा दूटप्पी खोटेपणा जनता जाणुन आहे. असेही प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणलेल्या व या सरकारच्या काळात राम शिंदे यांच्यामुळे स्थगिती आलेल्या कामांचा आढावा घेतला.
चौकट....
काल दि. ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन असल्याने पाणी योजनेस मंजुरी मिळविले बद्दल सत्कार त्यांनी न घेता महिलांनी दिलेली शंकर मुर्ती स्विकारून आपल्या सभ्यतेचे दर्शन घडवले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत मी आजचा सत्कार स्विकारत नाही. असे आ रोहित पवार यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा