खर्डा प्रतिनिधी : ७ डिसेंबर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त खर्डा ग्रामपंचायतसह विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय, खर्डा कृषी उत्पन्न उपबाजार समिती तसेच शाळा व महाविद्यालय आदी ठिकाणी अभिवादन करण्यात आले
दरम्यान खर्डा येथील धम्मसागर बुद्ध विहार येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून व सामूहिकरीत्या त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले त्यावेळी. भीमसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे,भाजपा कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवंसरा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे, राजू मोरे, महालिंग कोरे, वैजीनाथ पाटील ,गणेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल राहुल जावळे, व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा