खर्डा प्रतिनधी : १८ जानेवारी
सायकल चालवणे या सर्वात सोपा व फायदेशीर व्यायाम असून सायकल यात्रेव्दारे कायदेशीर शिबीरे घेऊन समाजात जागरूकता आणणणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी रोज थोडा का होईना व्यायाम करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथून अक्कलकोट कडे जाणाऱ्या सायकल रॅलीचे खर्डा येथे सरपंच आसाराम गोपाळघरे व खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ उगले यांचा वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपळगाव जलाल तालुका येवला, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयात हे शिबीर तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन राजमाता प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व खर्डा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिरामध्ये डॉ. विक्रम आव्हाड दिवाणी न्यायाधीश गोंदिया, बाळासाहेब पवार दिवाणी न्यायाधीश हिंगणघाट, जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भोरकडे, उपाध्यक्ष गणेश भोरकडे, सचिव नवनाथ भोरकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष थोरात, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती डॉ विक्रम आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना कॉफी, विनापरवाना मोटरसायकल चालवणे, कौटुंबिक हिंसाचार, घरगुती हिंसाचार, चमकोगिरी, व्यसन आदि विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच न्यायमूर्ती बाळासाहेब पवार यांनी बाल लैंगिक अत्याचार, शालेय गैरवर्तन, मुलींची छेडछाड, जातीय हिंसाचार आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच तहसिलदार योगेश चंद्रे ,विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ उगले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा मधुकर राळेभात, सरपंच आसाराम गोपाळघरे, आर्ट ऑफ लिविंगचे संतोष थोरात, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जामखेड नगर परिषदचे नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत मस्के, वैजिनाथ मिसाळ, नानासाहेब गोपाळघरे, अनिल धोत्रे यांच्यासह मागील सतरा वर्षापासून अविरत चाललेले ३५ सायकल स्वार ५२८ किलोमीटर अंतर सहा दिवसात पूर्ण करणारे सायकल स्वार उपस्थित होते .उपस्थित सायकल स्वरांचा सन्मान ग्रामपंचायत व विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मागील सतरा वर्षांपासून अविरत चालणाऱ्या सायकल स्वार हे गावोगाव वृक्षारोपण, मिशन दाणापाणी पक्षी ,दुर्मिळ बियाण्याची लागवड, रक्तदान शिबिर, पर्यावरण जागृती ,प्रदूषण मुक्ती, स्वच्छ भारत मोहीम ,सिताराम गडावर आरोग्य शिबिर ,सामाजिक कार्य करत प्रवास करतात .तसेच या सायकल स्वरांनी आपल्या सायकल पुढे झाडे लावा झाडे जगवा, एक सलाम महाराष्ट्र पोलिसांना, रक्तदान आहे जीवनदान व वाचवते दुसऱ्यांचे प्राण, विधी सेवा प्राधिकरण योजना जिथे तिथे अन्यायास वाचा फुटेल तिथे तिथे, द्यावा भांडणाला फाटा शोधू नका न्यायालयाच्या वाटा, साधा संवाद संपतो वाद आदी विविध सामाजिक संदेश देणारे फलक सायकल पुढे लावून सायकल भ्रमंती करतात.
राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष महालिंग कोरे यांनी सायकल स्वरांचे सागत व शिबीराचे आयोजन या कार्यक्रमासाठी योग्य ते नियोजन केले होते. या नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी व पाहुण्यांनी
राजमाता प्रतिष्ठान व अध्यक्ष महालिंग कोरे यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. रमेश पाटील, प्रस्ताविक आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष थोरात व आभार ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा