खर्डा प्रतिनधी-१९जानेवारी
खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा मुले ,खर्डा मुली व खर्डा उर्दू या शाळेच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न
तसेच अधक्षस्थानी तालुका पंचायत समिती माजी उपसभापती मनीषा सुरवसे होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून उपसरपंच रंजना लोखंडे, कवयित्री सविता विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्या कांचन शिंदे , संजीवनी पाटील, रोहिणी गोलेकर ,वैशाली थोरात, आर्ट ऑफ लिविंगचे संतोष थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुले मंजुषा गुरसाळी, समिती अध्यक्ष मुली मोनिका गोलेकर, केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते, मुख्याध्यापक राम निकम, बाबुराव गीते, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका समीना शेख, रुपेश वाणी, प्राथमिक शिक्षिका सुवर्णा मानेकर, रत्नप्रभात जगताप, ज्योती रासकर ,ज्योती ढवळशंकर ,श्रीहरी साबळे ,अमोल घाटोळे ,निसार सय्यद, रत्नप्रभा शिरसाठ यांच्यासह सुमारे ८० महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
यावेळी शाळेतील मुलींनी आलेल्या महिलांचे स्वागत गीत म्हणून केले, स्वागत करून संगीत खुर्ची, उखाणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच कवयित्री सविता विजयसिंह गोलेकर यांचे हृदयस्पर्शी अक्षरवेल या कवितासंग्रहाचे प्रकाशन संबंधित महिलांच्या उपस्थित मकर संक्रातीनिमित्त हळदीकुंकवाच्या समारंभात महिला मेळाव्यात करण्यात आले.
संक्रातीच्या सणाची माहिती व तीळ गुळाचे महत्व मुख्याध्यापक राम निकम यांनी सांगितले . सविता गोलेकर यांनी आपण मुलांसाठी काय केले पाहिजे तसेच त्यांचा अभ्यास कसा घेतला पाहिजे याविषयीची माहिती विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा मानेकर तर आभार ज्योती गुरसाळी यांनी मानल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा