जामखेड प्रतिनधी-१फेब्रुवारी
जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील महाविद्यालये व शाळा यांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची विद्यार्थींनींच्या छेडछाड व सुरक्षेच्या उपाय योजना रोड रोमियॉनचा चा बंदोबस्त करणे , रॅगिंग, विद्यार्थी शिस्त संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सहविचार सभा घेतली.
या मीटिंगला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी संबोधित करताना
सर्व शाळा व महाविद्यालयात CCTV असणे गरजेचे आहे जेथे CCTV नसतील त्यांनी तात्काळ बसवून घ्यावेत,
लहान मुलांना (18 वर्षाखालील) टू व्हीलर वाहन शाळेमध्ये आणण्यास मनाई करावी व त्यांचे प्रबोधन करावे.
शाळा भरताना व सुटताना गेटवर आपले शिक्षक नेमावे व पोलीस विभागामार्फत शाळा सोडताना व भरताना पेट्रोलिंग केली जाणार आहे. बेशिस्त काही घटना घडत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला कळवावे. शाळे मध्ये पोलीस स्टेशन चा नंबर सर्वांना दिसेल असा स्पस्ट भाषेत लावावा. विद्यार्थी विद्यार्थिनी साठी सुरक्षा बाबत मार्गदर्शन उपक्रम आयोजित करावेत.
वाहतूक पोलिस विभागा मार्फत वाहतुकीचे नियमाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शालेय पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करणे,
शिक्षक व पोलीस यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांचे हित सर्वांनी जपावे व गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक- पोलीस कटिबद्ध राहू ,शाळा महाविद्यालय व पोलीस विभाग यांचे समन्वय करून विद्यार्थ्यांची सुरक्षा नक्की वाढणार ,महाविद्यालय शाळा यांच्याकडून येणारा सूचनेचे पोलीस विभागामार्फत दखल घेतली जाणार आहे .
असे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
अशा विविध विषयांवर मिटींग मध्ये विद्यार्थांच्या संदर्भातील समस्या जाणुन घेऊन चर्चा करुन योग्य ते मार्गदर्शन केले आहे.
मिटींग करीता जामखेड महाविद्यालय प्राचार्य श्री डोंगरे एम एम ,ल ना हौसिंगचे प्राचार्य श्रीकांत हौसिंग , रयतचे श्री नागेशविद्यालय प्राचार्य मडके बी के , कन्या मुख्याध्यापिका चौधरी के डी खर्डा इंग्लिश स्कूलचे उगले एस आर, अरण्येश्वर अरणगावचे रमेश वराट , अणखेरी फकराबाद चे कोपनर डी पी , सावंत एन एन, जोरे बी डी , गायकवाड ए ए,श्रीम जोगदंड ए व्ही, शिंदे पी बी,पारखे एस एन, शिरसाठ ए एस , डॉ अण्णा मोहिते, वणवे एच एम, ठाकरे एस बी,म्हस्के एन आर, देडे ए के, मयुर भोसले,मोहिते डी व्ही, प्राचार्य, शिक्षक, एनसीसी ऑफिसर, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. मिटिंगचे आयोजन गुप्तवार्ता विभागाचे पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी केले होते
जामखेड तालुक्यातील सर्व विद्यालयाच्या प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन करून या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यालयांना शिस्ती संदर्भात नक्कीच फायदा होणार आहे असे मनोगत व्यक्त केले.
तसेच तालुक्यातील जामखेड खर्डा ,नान्नज ,जवळा ,आरणगाव ,हळगाव ,साकत ,फकराबद ,असे महाविद्यालय व शाळा यांचे सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक हजर होते.
No comments:
Post a Comment