खर्डा प्रतिनधी : १ फेब्रुवारी
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खर्डा व सर्व वाड्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठ्या निधीची अनेक कामे सुरू असून लवकरच खर्डा शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. तरच दि. २७ जानेवारी रोजी ग्रामसभेत उपस्थित झालेले सर्व प्रश्न व समस्या यावर योग्य त्या उपाययोजना करून त्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे सुचक वक्तव्य खर्डा गावाचे कार्यकुशल सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी केले आहे.
याबाबत पोलीस वारंट न्युज नेटवर्कच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांच्याशी संवाद साधताना सरपंच आसाराम गोपाळघरे म्हणले की,
नेहमीच खर्डा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहरी व वाकी या दोन्ही जलाशयांमध्ये मुबलक पाणी असले तरी त्या खर्डा शहराला पाणीपुरवठा करण्साठी ठिकाणी असलेले स्थानिक शेतकरी पाणीपुरवठ्याच्या डिपीवर अनेक अनधिकृत आकडे टाकून मोटारी चालवत असल्याने तेथील डिप्या उडतात तसेच विजेचाही अनेक वेळा घोटाळा होतो. याबाबत विज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यास तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे मोहरी व खैरी तलावत पाणी असतानाही खर्डा शहराला पाणीपुरवठ्याच्या व पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच ग्रामसभच्यापुर्वी पाणीपुरवठ्याची जी समस्या निर्माण झाली होती ती दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत होणाऱ्या रस्त्याचे काम करत असताना फुटलेल्या पाईप लाईनमुळे झाली होती. त्यावर तातडीने उपाययोजना करून खंडित झालेला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच खैरी व मोहरी तलावावर येणाऱ्या अडचणींवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत आहेत.
खर्डा जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावांत तालुक्यातील सर्वात मोठी सर्वात मोठी म्हणजेच ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. तसेच याठिकाणी असलेली ऐतिहासिक, धार्मिक स्थळे यामुळे तसेच आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार हे या गावाच्या विकासासाठी करत असलेली कामे पाहता खर्डा गावाला पर्यटनाच्या दृष्टीने खुप महत्व आले आहे. हे महत्व ओळखूनच आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली
खर्डा गावाचा नियोजनपूर्वक विकास होत आहे.
नुकत्याच दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेबाबत सांगायचे झाले तर ग्रामसभेत नागरिक नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे जसे की गवंडी गल्लीमध्ये महिलांच्या शौचालयातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे पाणी, महिला ग्राम संघ बचत गटासाठी जागा शोधून ऑफिससाठी जागा, याबरोबरच खर्डा बसस्थानकावर महिलांसाठी व प्रवाशांसाठी शौचालयचा प्रश्न, दूषित पाणी, पाण्याचे टी. डी. एस. न तपासणे, सोनेगाव चौकाचे बजरंग चौक नामकरण करणे, बसस्थानक परिसरात स्वछता करणे, खाजगी दवाखाने रात्री उघडत नसल्याने रूग्णांना येणाऱ्या अडचणी, सरकारी दवाखान्यात दोन डॉक्टर असताना होणारी गैरसोय, उघड्यावर शैचस बसणाऱ्यावर कारवाई करणे असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होते करण्यात आले होते. याबाबत आ. रोहित पवार व ग्रामपंचायत प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठेकेदारांवर अवलंबून न राहाता प्रत्यक्ष जातीने लक्ष दिले जाईल तसेच जी कामे ठेकेदारांमार्फत केली जातील तीही दर्जेदार होतील याकडे लक्ष दिले जाईल. यासाठी खर्डा वासियांना कोणतेही अंदोलन करावे लागणार नाही याचीही ग्वाही सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment