खर्डा प्रतिनधी-१२फेब्रुवारी
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्यांचा निषेध खर्डा प्रेस क्लब तर्फे खर्डा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
पोलीस नाईक संजय जायभाय पोलीस कॉन्स्टेबल पंडित हंबर्डे , गणेश बडे यांनी सदरचे निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जात आहे, पत्रकारांवर हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पत्रकार संरक्षण कायदा आहे, मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायला टाळता केली जात आहे. या घटना सतत वाढत असल्याने पत्रकारांना काम करणे कठीण झाले आहे.
महानगर टाइम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हे आपल्या दुचाकी ने जात होते त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारीशे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी छापली ते पंढरीनाथ आंबेरकर त्यांच्याच गाडीने अपघात होतो हा योगायोग नसून घातपातच करून मारले आहे आम्ही सर्व पत्रकार या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात दिला आहे. पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी विनंती करून राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासाठी वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे त्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न व्हावे अशी विनंती निवेदनात केली आहे.
सदर गुन्हेगारावर ३०२ चा गुन्हा दाखल करून ही केस जलदगती न्यायालयात चालवावी अशी मागणी खर्डा प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात, कार्याध्यक्ष दत्तराज पवार, सचिव अनिल धोत्रे, आशुतोष गायकवाड , महेश बजगुडे, धनसिंग साळुंके इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment