जामखेड प्रतिनधी-१२फेब्रुवारी
जागरुकतेच्या अभावामुळे समाजात आजही रक्तदानाबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक जण रक्तदान करण्यास पुढे सरसावत नाहीत.मात्र आपण रक्तदान केल्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अनमोल मदत होईल.थैलेसिमिया,हिमोफिलिया, ल्युकिमिया यासारख्या विकारांनी ग्रस्त असलेल्या पीडित रुग्णांना रक्ताची वारंवार गरज पडत असते अशा रुग्णांना रक्त वेळेवर उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीविकास धोका निर्माण होतो.अशा रुग्णांना आणि इतर गरजू रुग्णांसाठी रक्तदान करणे ही सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रक्तदान करायला हवे.रक्तदानाबद्दलची जाणीव जागृती करून रक्तदान ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.शशांक वाघमारे यांनी केले."महाआरोग्य व महारक्तदान" शिबिर उद्घाटन प्रसंगी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे ते बोलत होते.यावेळी विचार मंचावर वैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज खराडे,डॉ.शशांक शिंदे,अधिपरिचरिका सारिका माळी,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,स्नेहज्योत प्रकल्प क्षेत्रिय अधिकारी मजहर खान,डेटाएन्ट्री अधिकारी मोहित कदम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.वाघमारे म्हणाले की;रक्तदानाबाबत अधिकची माहिती घेऊन रक्तदान करण्यासाठी ज्यांचे वय १८ ते ६५ आणि वजन ४८ किलो पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्ती तसेच क्षयरोग (टीबी),फिरंग,हिपटायटिस,मलेरिया,मधुमेह,एच.आय.व्ही/एड्स या विकारांनी पीडित नसणारे व्यक्ती रक्तदान करू शकतात.निरोगी आणि सुदृढ व्यक्तींद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो.यामुळेच तर 'रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जीवनदान' असे संबोधले जाते.मात्र रक्तदान करण्यासाठी बहुसंख्य लोक आजही नकार देतात असे परखड मत'ही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी लतिका सातपुते,नेत्ररोग चिकित्सक डॉ.स्वाती गायकवाड,किशोर बोराडे,अर्चना धोंडे,राहुल वासकर,अर्चना घोडके,सविता शिंदे,डॉ.किशोर बोराडे,सीमा वणवे,धनंजय काळे,सचिन बेग विविध क्षेत्रातील मान्यवर,स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी,
रुग्णलयातील रुग्ण उपस्थित होते.डॉ.युवराज खराडे,योगेश अब्दुले,गणेश वाघमारे,श्याम जाधव,मोहित कदम,रोहित होडशीळ यांसह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.तर रुग्णलयातील रुग्ण तसेच नागरिकांनी महाआरोग्य शिबिरामध्ये विविध तपासणी करून घेत शिबिराचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन दादा बेग,उगले मावशी,घायताडक मावशी,वास्तरे मावशी आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment