अहमदनगर दिनांक : १३ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्जुन बोरुडे यांच्या पॅनलने १५ जागा जिंकून गेल्या २५ वर्षापासूनची सत्ता अबाधित राखली. विरोधी प्रशांत गायकवाड यांच्या पॅनलने ९ जागांवर विजय मिळविला. तर जामखेड येथील उमेदवार चंद्रकांत राळेभात व प्रकाश सदाफुले हे विजयी झाले आहेत. परंतु ते गायकवाड पॅनलचे असल्याने त्यांना विरोधी गटात बसावे लागणार आहे.
जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्यादित मजूर फेडरेशन या संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १२) मतदान घेण्यात आले मंजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष अर्जुन बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी मंडळाने तर विरोधी मंडळाने पारनेर बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. एकूण २० जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात बोरुडे यांच्या पॅनलच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत जिल्ह्यातील ६६८ मजूरसंस्थांच्या प्रतिनिधींना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. प्रत्येक संस्थेतील एका व्यक्तीला संस्थेने ठराव घेऊन मतदानाचा अधिकार दिलेला होता, त्यानुसार, ६६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका मतदाराला १८ मतदान करण्याचा अधिकार होता, सत्ताधारी बोरुडे यांच्या पॅनलकडून १८ उमेदवार व विरोधी गायकवाड यांच्या पॅनलकडून १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. बोरुडे यांच्या पॅनलकडून सर्वसाधारण नगर तालुका प्रतिनिधी मतदारसंघातील विकास जगताप व सर्वसाधारण कर्जत तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून लिलावती लाळगे हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, तर प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत र गायकवाड यांचे ९ व बोरुडे यांचे ९ उमेदवार निवडून आले. त्यामुळे बोरुडे यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांची संख्या ११ झाली व गेल्या २५ वर्षांपासूनची त्यांची सत्ता अबाधित राहीली.
बोरुडे पॅनलचे विजयी उमेदवार
अर्जुन बोरुडे (नगर शहर), अनिल पाचपुते (श्रीगोंदा तालुका), राजू फकीर (पाथर्डी), नामदेव ढोकणे (राहुरी), शंकर गायकवाड (श्रीरामपूर) उत्तमराव घोगरे (राहाता), विजय गायकवाड [(कोपरगाव), नानासाहेब कानवडे (संगमनेर, किशोर गायकवाड विशेष मागास प्रवर्ग) हे रविवारी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले, तर विकास जगताप (नगर) तालुका) व लिलावती लाळगे (कर्जत) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
गायकवाड पॅनलचे विजयी उमेदवार
प्रशांत गायकवाड (पारनेर तालुका), रामचंद्र राळेभात (जामखेड), तान्हाजी गायकवाड (नेवासा), बाळासाहेब सोनवणे (शेवगाव), सुशांत गजे (अकोले), प्रकाश सदाफुले (अनुसूचित जाती-जमाती), रुक्मिणी कराळे (महिला राखीव), विद्या काळे (महिला राखीव), प्रकाश बोरुडे (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी).
No comments:
Post a Comment