जामखेड प्रतिनिधी : १३ फेब्रुवारी
जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेची हमी व जबाबदारी असलेल्या जामखेड पंचायत समीतीला दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ही दुर्गंधी हटवण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेलाही याबाबत काही करणे अडचणीचे ठरत आहे. याचे कारणही तसेच आहे . जामखेड शहरातून जाणाऱ्या श्रीगोंदा ते जामखेड हद्द या राष्ट्रीय महामार्गाचे होत असलेल्या कामामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कोणतेही काम होताना दिसत नाही. जामखेड शहरातील हा रस्ता लवकर करावा अशी मागणी होऊनही रस्त्याच्या लांबलेल्या कामांमुळे नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत असताना जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायत हद्दीतील विकासाचे काम करणाऱ्या ईतक्या मोठ्या प्रशासकीय यंत्रणेला अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यापेक्षा जामखेड तालुक्याचे दुर्दैव असे ते काय असा प्रश्न जामखेडकरांना पडला आहे.
जामखेड पंचायत समीती ही जामखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. नगर रोडवर असलेल्या या कार्यालया समोरून वाहत असलेल्या गटार व सांडपाण्याचे मोठे डबके निर्माण झाले आहे. पंचायत समीती जाण्यासाठी वाहने व नागरिकांना मोठी कसरत व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी यांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला होता. मात्र हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग (नॅशनल हायवे) असल्याने व शहरातील काम लवकरच करण्यात येणार असल्याने येथे केलेले काम नुकसान कारक ठरेल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानेमुळे येथे काम करण्यात अडचणी येत आहेत अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. परंतू आता पुन्हा याबाबत नगरपरिषदेला या दुर्गंधीबाबत माहिती दिली असून लवकरच काही तोडगा निघेल अशी शक्यता आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जामखेड शहरालगत असलेल्या पंचदेवालय ते शासकीय दुध संघापर्यतचे काम विविध कारणांनी रखडले आहे. मोठ मोठे खड्डे, त्यात टाकलेला मुरूम व त्यावर सकाळ संध्याकाळ शिंपडण्यात येणारे पाणी यामुळे आगोदर वाहनधारक व नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असताना. पंचायत समीती सारख्या मोठ्या प्रशासकीय यंत्रणेलाही अश्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आपल्या तालुक्याला मोठ मोठे लोकप्रतिनिधी लाभलेले असताना या समस्येतून आपली सुटका कधी होईल असा प्रश्न जामखेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment