जामखेड प्रतिनधी-७ फेब्रुवारी
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आ. प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. या पाठपुराव्याला आता मोठे यश येताना दिसत आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघातील १६ गावांसाठी ४ कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तसा शासन निर्णय ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून जारी करण्यात आला आहे. निधी मंजुर होताच मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध विकास कामे व्हावीत, यासाठी आमदार राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला निधी मंजुर करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार संबंधित विभागाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल ४ कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी दीड कोटी तर कर्जत तालुक्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजुर झाला आहे. सदरचा निधी मंजुर होताच मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांनी विकास कामे मार्गी लावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा शिंदे पर्व सुरु झाले आहे. आमदार राम शिंदे यांनी मंत्री असताना मतदारसंघात प्रचंड विकास कामे खेचून आणली होती. आताही शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमांतून आ. प्रा .राम शिंदे यांनी विकास कामे खेचून आणण्याचा धडाका सुरु केला आहे. आमदार राम शिंदे यांच्या माध्यमांतून मतदारसंघातील १६ गावांमध्ये भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा भरीव निधी मंजुर होताच मतदारसंघातील जनतेमध्ये तसेच दलित समाजासह भीमसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चौकट
"राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड शहरात नुकत्याच पार पडलेल्या संविधान महोत्सवात बोलताना कर्जत-जामखेड मतदारसंघात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. अखेर 15 दिवसाच्या आतच आमदार प्रा राम शिंदे यांनी आपली घोषणा खरी करून दाखवली. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघासाठी 4 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेडमध्ये दिलेला शब्द खरा करून दाखवल्याबद्दल जनतेकडून आमदार राम शिंदे यांच्या धडाकेबाज कामाचे कौतुक होत आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत जामखेड तालुक्यात मंजुर झालेली कामे आणि निधी खालीलप्रमाणे
1) खर्डा - आण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक भवन उभारणे - २५ लाख रूपये
2) साकत - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन उभारणे - २५ लाख रूपये
3) धोंडपारगाव- दलित वस्तीमध्ये बौध्द विहार बांधणे - २५ लाख रूपये
4) पाटोदा - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - २५ लाख रूपये
5) शिऊर - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - २५ लाख रूपये
6) जवळा - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - २५ लाख रूपये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत कर्जत तालुक्यात मंजुर झालेली कामे आणि निधी खालीलप्रमाणे
1) येसवडी - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - १५ लाख रूपये
2) आंबीजळगाव- दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - २५ लाख रूपये
3) नागलवाडी - आण्णाभाऊ साठे नगर मध्ये सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे - २० लाख रूपये
4) भांबोरा- दलित वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधणे - २५ लाख रूपये
5) राशीन - दलित वस्तीमध्ये बौध्द विहार बांधणे - ५० लाख रूपये
6) मिरजगाव - दलित वस्तीमध्ये फुले आंबेडकर सामाजिक भवन बांधणे - ५० लाख रूपये
7) दिघी - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - 15 लाख रूपये
8) निमगांव गांगर्डा - शेलार वस्तीमध्ये क्राँकीट रस्ता करणे - १५ लाख रूपये
9) बेनवडी - दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे - 25 लाख रूपये
10) खेड - दलित वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधणे - १० लाख रूपये
No comments:
Post a Comment