खर्डा प्रतिनधी : ७ फेब्रुवारी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खर्डा येथे खर्डा शहरातून भुम रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येत असून या कामात मोठी अनियमितता आढळून येत आहे. हे काम बारामती येथील ठेकेदारामार्फत करण्यात येत असून हे काम करताना नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने त्यांच्या दुकानापुढे व वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्याच्या बाजूला टाकला जात आहे. तसेच हे काम करताना माती मिस्त्रीत मुरूम रस्त्यावर टाकला जात आहे. याबाबत ठेकेदार व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांना सांगितले तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे स्थानिक नागरिक व ये-जा करणाऱ्या वाहन धारकांना मोठा त्रास तसेच छोट्या मोठ्या अपघातास सामोरे जावे लागत आहे. यामधे वेळीच सुधारणा न केल्यास भाजपाच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी सुरवसे यांनी दिला आहे.
या समस्येबाबत जनतेच्या तक्रारी आल्यानंतर रवी सुरवसे यांनी सदर कामावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, यांचे सह टिलू पंजाबी, बाळासाहेब गोपाळघरे, गणेश शिंदे,मदन गोलेकर, बाजीराव गोपळघरे, भागवत सुरवसे, बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी पानसरे, तलाठी श्रीराम कुलकर्णी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या कामात अनियमितता आढळून आली असून मुरूमा ऐवजी शेतातील मातीचा वापर करण्यात येत असून खडीचा वापरही योग्य पध्दतीने करण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बारामती येथील ठेकेदार करत असून या ठेकेदारस एका मोठ्या राजकीय नेत्याचे अभय असल्यानेच ठेकेदाराकडून कामात अनियमितता व नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने काम केले जात असल्याचा आरोपही भाजपाचे नेते रविंद्र सुरवसे यांनी केला आहे.
हे काम उत्कृष्ट पध्दतीने करावे व नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र अंदोलन कले जाईल असा इशारा रविंद्र सुरवसे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment