पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ फेब्रुवारी
जामखेड तालुक्यातील दिवंगत युवा उद्योजक कै. मयुरशेठ कांकरिया यांच्या आदर्शवत सामाजिक कार्याचा आदर्श घेत त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनी व स्मरणार्थ कै. मयुर कांकरिया मित्र परिवार खर्डा यांच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील नळीवडगाव फाटा येथील श्री. संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रम या वृद्धाश्रमात निराधार वृध्दांना किरणा व फळ वाटप करून स्व. मयुर कांकरिया यांच्या पुण्यस्मृतीला उजाळा देण्यात आला. अशी माहिती
या कार्यक्रमाचे आयोजन कै. मयुर कांकरिया मित्र परिवार खर्डा यांच्या वतीने करण्यात आले होते. नळीवडगाव फाटा येथील श्री. संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमात झालेले कार्यक्रमावेळी
खर्डा ग्रामपंचायतचे सदस्य महालिंग कोरे, मोहसिन तांबोळी, बाळासाहेब रणभोर, स्वप्निल अंकुश, किरण काळे,किशोर दुषी , दत्तात्रय चिंचकर , बाबु गोलेकर, गणेश नेहरकर, सदाम तांबोळी, अतुल भागवत, सचिन दुशी, गणेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा उद्योजक कै.मयुरशेठजी कांकरीया हे समाजातील गोर गरिब व गरजूंना विविध प्रकारे व नेहमीच मदत करत होते. तसेच त्यांनी श्री. संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमात येऊनही येथील निराधार वृध्दांना किरणा व फळे, ब्लँकेट वाटप करून नेहमीच आधार देण्याचे काम केले होते. आज दि. २४ फेब्रुवारी रोजी कै. मयुरशेठ यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिवशी किरणा व फळ देण्यात आला. यावेळी त्यांच्या पुण्यस्मृतीला उजाळा देताना येथील वृध्दांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
यापुर्वीही कै. मयुर कांकरिया मित्र परिवार खर्डा यांच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्या अंतर्गत गेल्या वर्षी
गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच खर्डा बस स्थानकावर बाकडे दिले होते टाकण्यात आले होते.
No comments:
Post a Comment