पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ फेब्रुवारी
जामखेड शहरातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे वस्तीगृह शहराच्या एका टोकाला असून सुरक्षेच्या प्रश्नाबरोबरच एका मोठ्या वस्तीच्या सांडपाण्याच्या दुर्गंधीचा मोठा त्रास येथे राहणाऱ्या विद्यार्थीनींना सामना करावा लागत असून वस्तीगृह प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने वरिष्ठ पातळीवर याचा तोडगा काढावा अशी मागणी जामखेड तालुक्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांमधून होत आहे. तसेच लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष देऊन या वस्तीगृहातील विद्यार्थींची समस्या सोडवणे गरजेचे आहे.
जामखेड तालुक्यासह इतर जवळच्या तालुक्यातून गरीब परंतू हुशार अशा अनुसूचित समाज घटकातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन व विविध ठिकाणी व्यवसाईक शिक्षण घेत असलेल्या साधारण ६० विद्यार्थीनी आहेत. या वस्तीगृहासमोर भलीमोठी गटार आहे. ही गटार वस्तीगृह स्थापन झालेपासून असून तीचे कोणत्याही पध्दतीचे काम न केल्याने तीचे मोठे स्वरूप झाले आहे. सदाफुले वस्ती ही साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेली लोकवस्ती आहे. या वस्तीचे जवळपास सर्वच सांडपाणी याच गटारातून जात आहे. तसेच वस्तीगृहाच्या समोरच्या बाजूला मोठा केरकचरा व कंपाऊंडच्या आत असलेल्या झाडाचाही पालापाचोळा यामुळे मोठय़ा प्रमाणावर केरकचरा व गटारींची दुर्गंधी यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे कोणत्याही शासकीय कार्यालय किंवा नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष नसल्याने येथील मागसवर्गीय मुलींना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून व्यक्त केली.
No comments:
Post a Comment