पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ फेब्रुवारी
महाराष्ट्राच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने खा. डॉ सुजयदादा विखे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या व्दारी या योजने अंतर्गत महाराजस्व अभियान नियोजन बैठक संपन्न झाली. तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेंतील साहित्यांचे वाटप व
जामखेड ते सौताडा या राष्ट्रीयमहामार्गावरील रत्याच्या कामांचे भूमिपूजन या दरम्यान करण्यात आले.
जामखेड येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीसाठी भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी सुरवसे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. मुरूमकर मुरूमकर, नगर परिषदेचे माजी सभापती अमित चिंतामणी, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, करण ढवळे, तहसीलदार योगेश चंद्रे आदी मान्यवरांंसह महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कार्यालयातील अधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जामखेड येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतील साहित्याचेही केले वाटप
जामखेड येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतील साहित्यांचे वाटप खा. डॉ सुजयदादा विखे व आ. राम शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. भगवान मुरूमकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अजय काशीद, रवींद्र सुरसे,भाजपा युवा मोर्चे चे तालुका अध्यक्ष शरद कार्ले,,पांडुरंग उबाळे, सुरेश जाधव, प्रवीण चोरडिया, उदय पवार, करण ढवळे, जालिंदर चव्हाण, संदीप जायभय, लहू शिंदे, बाळासाहेब गोपळघरे राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता पालवेंसह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांचे भूमिपूजनही खा. डॉ. सुजय विखे व प्रा. आ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment