जामखेड प्रतिनधी-९ फेब्रुवारी
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ४६ प्राथमिक शाळांमध्ये आमदार प्रा राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून डिजीटल स्कुल संकल्पना राबवली जाणार आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील २६ तर जामखेड तालुक्यातील २० शाळांचा समावेश असणार आहे. त्यादृष्टीने आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर कर्जत-जामखेडच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षणाची गंगा अवतरणार आहे. आ. प्रा राम शिंदे यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे जनतेत तसेच शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कर्जत-जामखेड हा मतदारसंघ कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो, या भागात मोठ्या शिक्षण संस्था नाहीत, परंतू शिक्षणाचा महत्वाचा पाया असलेल्या प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्राथमिक शाळांमध्ये अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील ४६ प्राथमिक शाळांसाठी इंटरॲक्टीव्ह पॅनल, इ- लर्निंग सॉफ्टवेअर, किबोर्ड माऊस, ऑफ लाईन यु.पी.एस. (1KV) हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसा प्रस्ताव आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीला दिला आहे.
ग्रामीण भागातील शाळांना अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळा, शिक्षक व मुख्याध्यापकांकडून डिजीटल स्कुलसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन देणेबाबतची मागणी आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे सातत्याने होत होती, याच मागणीची तातडीने दखल घेऊन आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील ४६ प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल स्कुल संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील २६ तर जामखेड तालुक्यातील २० शाळांचा समावेश आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळात स्वागत केले जात आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल स्कुल संकल्पना राबवली जाणार आहे, लवकरच ४६ शाळा साहित्य उपलब्ध होणार आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण उपलब्ध होणार असल्यामुळे पालकवर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. यामुळे आमदार राम शिंदे हे मतदारसंघात दररोज चर्चेत येऊ लागले आहेत. सध्या विरोधक कोमात आमदार शिंदे जोमात असेच चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे.
आ.प्रा.राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून खालील शाळांमध्ये डिजीटल स्कुल संकल्पना राबवली जाणार आहे.
1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जामखेड मराठी मुले
2) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जांबवाडी, जामखेड
3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महादेव गल्ली, जामखेड
4) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,श्रमजीवी वसाहत, जामखेड
5) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भवरवाडी, जामखेड
6) जिल्हा परिषद प्राथ. शाळा,डिसलेवाडी, जामखेड
7) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मोहळकर वस्ती, नान्नज, जामखेड
8) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धोंडपारगाव, जामखेड
9) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,राजेवाडी, जामखेड
10) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चोभेवाडी, जामखेड
11) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बारगजे वस्ती, खर्डा जामखेड
12) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाकी, जामखेड
13) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खाडे वस्ती, खर्डा, जामखेड
14) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मुंगेवाडी, जामखेड
15) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,घुले वस्ती, नायगाव, जामखेड
16) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सतेवाडी, जामखेड
17) जिल्हा परिषद प्राथ. शाळा,वंजारवाडी, जामखेड
18) जिल्हा परिषद प्राथ. शाळा,कुटे वस्ती, सोनेगाव, जामखेड
19) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गितेवाडी, तेलंगशी, जामखेड
20) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धनगर वस्ती, तेलंगशी, जामखेड
कर्जत तालुक्यातील प्राथमिक शाळा खालीलप्रमाणे...
1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,होलेवाडी, कर्जत
2) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुंभेफळ, कर्जत
3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बागवस्ती, कर्जत
4)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सौतडेवस्ती, राशीन, कर्जत
5) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,हंडाळवाडी, कर्जत
6) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धावडेवस्ती, कर्जत
7) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सिद्धटेक, कर्जत
8) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिरजगाव मुले
9) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मिरजगाव मुली
10) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तिखी, कर्जत
11) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चखालेवाडी, कोंबळी, कर्जत
12)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेंदवस्ती, कोंबळी, कर्जत
13 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाकणवाडी, कोंबळी, कर्जत
14) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दगडवाडी, कोंबळी, कर्जत
15) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघनळी, कर्जत
16) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चाहूरवाडी, कोंबळी, कर्जत
17) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गंगेवाडी, पाटेगाव, कर्जत
18) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झिंजेवाडी, पाटेगाव, कर्जत
19) जिल्हा परिषद प्राथमिक. शाळा, टकले भिसे वस्ती, पाटेगाव, कर्जत
20) जिल्हा परिषद प्राथमिक. शाळा, मेंगडे वस्ती, पाटेगाव, कर्जत
21) जिल्हा परिषद प्राथमिक. शाळा, खातगाव, कर्जत
22) जिल्हा परिषद प्राथमिक. शाळा, सटवायवाडी, बांभोरा, कर्जत
23) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांगरे वस्ती, बहिरोबावाडी, कर्जत
24) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदे वस्ती, चापडगाव, कर्जत
25) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्हरकावाडी, बहिरोबावाडी, कर्जत
26) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडाळा, कर्जत
No comments:
Post a Comment