खर्डा प्रतिनिधी : ८ फेब्रुवारी
खर्डा शहराच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेले सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील व अनेक वर्षांपासून मागणी असलेला पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळा ते लोहकरे वस्ती या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचा प्रश्न आ रोहित पवार यांच्या सहकार्याने पूर्ण करून या परिसरातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती केल्याने त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
गेली अनेक वर्षापासून पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळा ते लोहकरे वस्तीच्या रस्त्याचा दयनीय अवस्थेत पडलेला प्रश्न अनेक वेळा मागणी करूनही मार्गी लागत नव्हता. नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनासहित राजकीय पुढाऱ्यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेले होते. खर्डा जिल्हा परिषद गटात अनेक रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले परंतु हा प्रश्न जैसे तेच होता. या रस्त्याने शेतकऱ्यांचे रोजचेच येणे जाणे असते. पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना चिखलातूनच घर व शाळा गाठावी लागत होती. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही रस्त्यामुळे दूध आणण्याची अडचण होती. अशा अनेक समस्यांना पांढरेवाडी व लोहकरे वस्ती येथील नागरिकांना सामोरे जावे लागत होते. तसेच रस्ता व्यवस्थित नसल्याने त्यांची फार मोठी हेळसांड होत होती.
यासंदर्भात विचार करून सरपंच गोपाळघरे यांनी या रस्त्याला भेट दिली असता त्यांना येथील नागरिकांची रस्त्याबाबत खरी समस्या समजली. त्याच वेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांना रस्ता पूर्ण करून देण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी आ. रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषद (२५१५ लेखाशीर्ष) ग्रामविकास विभागाकडून सतत पाठपुरावा करून २०० मीटर रस्त्यासाठी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला व लगेच कामास सुरुवात करून प्रत्यक्षात आज या ठिकाणी सुंदर असा सिमेंट रस्ता पूर्ण करून पांढरेवाडी व लोहकरे वस्ती नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे पांढरेवाडी व चोधार वस्ती येथील नागरिकांना शेतात व विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येण्यासाठी हा रस्ता सध्या सुखकर झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त आ. रोहित पवार व सरपंच आसाराम गोपाळघरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment