जामखेड प्रतिनिधी :८ फेब्रुवारी
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड ( पुणे) ला अनेक गुन्ह्यात हवा असणारा व गेल्या अनेक दिवसांपासुन पोलीसांना चकवा देत फरार असलेला जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथील आरोपी सावळा शिवाजी खाडे यास मोठ्या शिताफीने अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. या दमदार कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथील आरोपी सावळा शिवाजी खाडे हा पुणे शहरातील निगडी पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब), II(क) व नारकोटीक्स विभाग पुणे, - 366/2022, एन. डी. पी. एस. कलम 8 (क), 20 (ब), II(क) 3) नारकोटीक्स विभाग पुणे - 499 / 2022, एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब), II(क) या गुन्ह्यातील आरोपी असून तो त्याच्या मुळगावी पाटोदा गरड, तालुका जामखेड येथे येत आहे. अशी माहीती पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक अजित कुटे यांना मिळाल्याने त्यांनी याबाबत त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतीष पवार (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड, पुणे) यांना कळविले. त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिली त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे व अंमलदार पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करुन आरोपी सावळा शिवाजी खाडे याचे बद्दल आवश्यक ती माहीती देवुन आरोपीस तात्काळ अटक करणेबाबत आदेशीत दिल्याने जामखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने सावळा शिवाजी खाडे, याचे बाबत माहीतीची जमवाजमव करण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी सावळा शिवाजी खाडे हा दि- ६ फेब्रुवारी रोजी त्याची गावी येणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनी सदर माहीती अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड यांना कळवुन त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेतले, यावेळी पोनि. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक . संपत कन्हेरे, पोलीस काॅन्स्टेबल अरुण पवार, संदिप राऊत, संदिप आजबे, विजय कोळी, पोलीस हेडकॉन्टेबल हनुमान आरसुळ व पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड, पुणे येथील सहाय्यक फौजदार सुर्यवंशी, पोलीस हेडकॉन्टेबल बनसोडे, पोलीस नाईक कुटे व पोलीस नाईक धस यांनी आरोपी याचा त्याचे गावात शोध घेत असताना आरोपी खाडे हा त्याच्या घराचे छतावरील पत्र्यावर लपुन बसला असल्याचे समजले त्यांनतर लगेच त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन पुढील तपासकामी आरोपी सावळा शिवाजी खाडे यास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड येथील पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवडचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक . संपत कन्हेरे, पोलीस काॅन्स्टेबल अरुण पवार, संदिप राऊत, संदिप आजबे, विजय कोळी, पोलीस हेडकॉन्टेबल हनुमान आरसुळ यांचे पथकाने केलेली असुन सदर पथकाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे कडुन अभिनंदन करण्यात येत आहे.
आरोपी सावळा शिवाजी खाडे, रा. पाटोदा (गरड), ता. जामखेड याचे विरुध्द एन.डी.पी.एस कलमानुसार खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) निगडी पो.स्टे. - 295/2022, एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब), II(क)
2) नारकोटीक्स विभाग पुणे, - 366/2022, एन. डी. पी. एस. कलम 8 (क), 20 (ब), II(क) 3) नारकोटीक्स विभाग पुणे - 499 / 2022, एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब), II(क)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा