खर्डा प्रतिनिधी : ८ फेब्रुवारी
अनेक प्रयत्नांनंतर मंजूरी मिळालेल्या मदारी समाजाच्या घरकुलांसाठी खर्डा ग्रामपंचायतने ग्रामदैवत कानिफनाथ यात्रेच्या जागेवर घरे बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र दि. ६ मार्च रोजी होणाऱ्या कानिफनाथ यात्रेच्या निमित्ताने खर्डा ग्रामपंचायतचा गलथान कारभार समोर आल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र खर्डा व परिसराच्या विकास व सामाजिक समन्वय यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले भारतीय जनता पार्टीचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी (दादा) सुरवसे यांनी लक्ष घालून आज दि. ८ फेब्रुवारी रोजी तोडगा काढत होणारा संभाव्य पेच (संघर्ष) टळला आहे.
खर्डा येथील मदारी समाजासाठी दहा घरकुलांच्या बांधकामांसाठी खर्डा ग्रामपंचायचे सरपंच आसाराम गोपळघरे , ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, उपसरपंच श्रीकांत लोखंडे व सदस्य यांनी काही महिन्यापूर्वीच
ग्रामदैवत कानिफनाथ या जागेत त्यांना घरे बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र सदर जागेवर दरवर्षी ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा भरते, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. हा प्रश्न संपूर्ण गावाचा असल्याने यात्रा नेमकी भरणार तरी कुठे? हा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे गावामध्ये वाद निर्माण होण्याची परिस्थिती झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते रवी (दादा) सुरवसे यांनी प्रत्यक्ष सदर जागेवर जाऊन तसेच खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच आसाराम गोपळघरे व ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ॲड. अरुण जाधव, सरपंच आसाराम गोपळघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते , व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांची ग्रामदैवत कानिफनाथ मंदिर येथे बैठक घेतली व जागेचीही पाहणी केली.
भाजपा नेते रवी सुरवसे यांनी योग्य पध्दतीने विषय हाताळला व यात्रेसाठी राखीव जागा ठेवण्यात आली. तसेच मदारी समाजासाठी मंजूर घरकुलांना जवळच असलेल्या गट नंबर ११४१ मध्ये जागा देऊन त्यांनाचाही प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ , कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, सरपंच आसाराम गोपळघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, अॅड.अरुण जाधव, ग्रामपंचायत सदस्य वैजीनाथ पाटील, गणेश शिंदे, मदन गोलेकर, टिल्लू पंजाबी,महेश दिंडोरे, भागवत सुरवसे ,प्रशांत कांबळे व मदारी समाजातील नागिरक उपस्थित होते
No comments:
Post a Comment