खर्डा प्रतिनधी : ४ फेब्रुवारी
खर्डा ग्रामपंचायतचे कार्यकुशल सरपंच आसाराम गोपाळघरे व ग्रामपंचायत सदस्य डॉ.सोपान गोपाळघरे यांनी पुढाकार घेऊन अंगणवाडीचे काम पूर्ण करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून ३ लाख व ग्रामनिधीतून २ लाख असा ५ लाख रुपयांचा निधी या अंगणवाडीच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आला असून या निधीतून या अंगणवाडीचे रुपडे पालटवणार असून ती डिजिटल बनवण्याचा मानस सरपंच आसाराम गोपाळघरे केला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील नागोबाचीवाडी येथील १५ वर्षा पूर्वी बांधलेल्या अंगणवाडीची अवस्था दयनीय झाली आहे. अंगणवाडीचे बांधकाम झाल्यापासून या ठिकाणी एकही दिवस आंगणवाडी भरली नाही. तिची अवस्था गावाच्या एखाद्या उकरड्यासारखी झाली आहे. या इमारतीच्या चारही बाजूंनी सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते व दरवाजे खिडक्या सुद्धा नाही. नागोबाचीवाडी येथील अंगणवाडी गावाच्या मंदिरात किंवा जागा मिळेल त्या ठिकाणी भरत आहे या ठिकाणी अंगणवाडी सध्या ४० चिमुकले मुले व मुली आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात ज्ञानार्जन घेत आहेत. परंतु याबाबत खर्डा येथील कार्यकुशल सरपंच आसाराम गोपाळघरे व ग्रामपंचायत सदस्य डॉ. सोपान गोपाळघरे यांनी पुढाकार घेऊन अंगणवाडीची इमारत तयार करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून ३ लाख रुपये व ग्रामनिधीतून २ लाख असा ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून या अंगणवाडीचे रुपडे पालटणार असून ही आंगणवाडी डिजिटल बनवण्याचा मानस केल्याचे सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी सांगितले. यासाठी जामखेड पंचायत समितीचे शाखा अभियंता महेंद्र लिमजे यांनी या जुन्या अंगणवाडीला भेट देऊन नवीन आराखडा तयार केला आहे.
यामुळे नागोबाचीवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आसाराम गोपाळघरे व पदाधिकारी यांचे आभार मानले जात आहेत.
No comments:
Post a Comment