खर्डा प्रतिनधी ३ फेब्रुवारी
खर्डा येथे ज्ञानधारा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी शाखेचा विविध मान्यवरांच्या हस्ते आज शुभारंभ , तेसच सुरेश ज्ञानोबा कुटे यांनी बीड येथून सुरू केलेल्या ज्ञानधारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली होती आज बँकेच्या ४६ शाखा सुरू करून बँकिंग क्षेत्रात तसेच उद्योग व्यवसायात त्यांनी मोठ्या कष्टाने करोडो रुपयांचा उद्योग उभा केला आहे त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत, त्यांचे कौतुक झाले पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प.रामकृष्ण रंधवे महाराज बापू यांनी व्यक्त केले.
ते खर्डा येथे ज्ञानधारा मल्टीस्टेज को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी ह. भ. प. महालिंग नगरे, महाराज ह. भ. प. कैलास भोरे, महाराज ह. भ. प. विकास वायसे, महाराज ह. भ. प. हरिभाऊ गीते, महाराज, सरपंच आसाराम गोपाळघरे, कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र सुरवसे, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर इ.उपस्थित होते.तसेच त्यांचाही सत्कार ज्ञानधारा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने करण्यात आला.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सुरेश कुटे हे सेवाधारी अभ्यासू व प्रामाणिक व्यक्ती आहेत खर्ड्यासारख्या ग्रामीण भागातील पेठेत त्यांनी ज्ञानधारा बँकेची शाखा सुरू केली आहे, सहकारातून समृद्धीचा, आम्ही जपतो वारसा विश्वासाचा,, अशी मराठवाड्यातील पहिलीच मल्टीस्टेट बँक त्यांनी बीड येथून सुरू केली त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
बँकेच्या माध्यमातून त्यांनी कर्ज वाटप करून येथील व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करावा व बँकेतील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना चांगली सुविधा निर्माण करून द्यावी तसेच कुटे घराणे हे जनता जनार्दनांची सर्वात मोठी सेवा करीत आहेत त्यामुळे ते बँकिंग व उद्योग क्षेत्रात यशस्वी होत असल्याचे रामकृष्ण रंधवे महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ज्ञानधारा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे म्हणाले की, ज्ञानधारा मल्टीस्टेट बँकेच्या महाराष्ट्रात व मध्य प्रदेश येथे इंदोर अशा एकूण ४६ शाखा यशस्वीपणे सुरू आहेत तसेच बँकेच्या एकूण २२७६ कोटी रुपयांच्या ठेवी असून बँकेने आतापर्यंत पंधराशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे, तसेच त्यांनी बँकेच्या सर्व कामकाजाची व व्यवहाराची इत्यंभूत माहिती आपल्या मॅरेथॉन भाषणातून देऊन सर्व खर्डेकरांच्या भावनेला हात घालून उपस्थितांची मने जिंकून घेतल्याची चर्चा कार्यक्रम स्थली उमटून गेली.
यावेळी खर्डा येथील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या व्यापारी व इतर क्षेत्रातील,यामध्ये खर्डा येथील सोन्या-चांदीचे व्यापारी अवीशेठ शहा, कापडाचे व्यापारी किशोरशेठ कांकरिया, किराणा व्यापारी शंकरशेठ गुळवे, शहा हार्डवेअरचे राजनशेठ शहा, खर्डा प्रेस क्लबचे संतोष थोरात खर्डा हायस्कूलचे प्राचार्य उगले सर, छत्रपती कॉलेजचे प्राचार्य घोडके सर, डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर अंकुश गोपाळघरे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के उपसरपंच श्रीकांत लोखंडे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी खर्डा व परिसरातील व्यापारी बांधव, छोटे मोठे व्यावसायिक, शेतकरी, समाजातील सामाजिक व क्षेत्रातील काम करणारे मान्यवर तसेच बहुसंख्य खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानधारा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय अधिकारी गोरे यांनी तर आभार महाव्यवस्थापक शिंदे साहेब यांनी मानले.
No comments:
Post a Comment