पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २ मार्च
जामखेड तेलंगशी बसने प्रवास करत असताना बसमधील प्रवाशी महिलेचे मंगळसूत्र चोरी करण्यात आल्याचे समजताच महिलेने आरडाओरडा केल्यानंतर यातील फिर्यादी महिला व प्रवाश्यांच्या साह्याने दोन्ही संशयीत महिलांना ताब्यात घेण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
याबाबत जामखेड पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील कमल महालिंग विभुते ही ७५ वर्षीय वृध्द महिला आज दि. २ मार्च रोजी दुपारी ०२/३० वाजताचे सुमारास मी एमएच-४० एन ८८९७ ह्या गाडीमधून मी जामखेड येथे दवाखाण्यात उपचारासाठी येत असताना जामखेड बस स्थानक येथे दुपारी ०३.१५ वा सुमारास बसमधून उतरत असताना बाजूला उभी असलेल्या महिलेने तीच्या गळ्यातील १२ ००० रूपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र ओढले असे वाटले असता मी गळ्याकडे पाहिले तर गळयातील मंगळसूत्र नसल्याचे पाहून फिर्यादी महिलेने मोठयाने आरडाओरडा केला. असता लोकांनी त्या दोन संशयित महिलांना जागेवरच पकडले व जामखेड बसस्थानक येथेच धरून ठेवले.
सदर दोन संशयित महिलांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव छाया बबन भोसले रा.कासारी ता. आष्टी जि.बीड व आश्वीन अवि भोसले रा. माहिजळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर असे सांगितले यावरून यातील फिर्यादी महिला
कमल महालिंग विभुते यांच्या फिर्यादीवरून छाया बबन भोसले रा.कासारी ता. आष्टी जि.बीड व आश्वीन अवि भोसले रा. माहिजळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर या दोन संशयित महिलांविरूध्द भादवी ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय लोखंडे, हे करत असून सदर आरोपी महिलांना ताब्यात घेणे कामी पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे ,अरुण पवार, संदीप आजबे ,संदीप राऊत, प्रकाश जाधव यांनी कामगिरी बजावली.
No comments:
Post a Comment