पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दि. ६ मार्च रोजी होत असलेला
ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा उत्सव यावर्षी पहिल्यांदाच ६ व ७ मार्च असा सलग २ दिवसांचा होत आहे. या यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या वतीने सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली काल सायंकाळी ५:०० वाजता खर्डा पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली.
यावेळी कानिफनाथ यात्रेत पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षे बाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यावर्षी खर्डा पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच खर्डा येथे दोन दिवशीय कानिफनाथ यात्रा भरवणार आहोत. खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य ती खबरदारी घेताना यात्रेत सुरक्षेसाठी
१७ पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त करणार आहोत. त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विषय राहणार नाही. मंदिरात दर्शनासाठी जाताना पुरुषांसाठी वेगळी व महिलांसाठी वेगळी लाईन असेल.कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. यावेळी महिलांसाठी योग्य ती सुरक्षा अधिक प्रमाणात देण्यात येणार आहे. पाळण्याच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता असते तर तिथे आमचे कॉन्स्टेबल राहतील.
गैरप्रकार प्रकार घडत असेल तर कोणत्याही पक्षाचा नेता असो मी कोणत्याच पुढाऱ्याचा फोन स्वीकारणार नाही व सहकार्य पण करणार नाही. मी माझ्या पद्धतीनेच काम करणार. गैरप्रकार करणाऱ्या वर योग्य ती कार्यवाही केली जाईल. टवाळखोर मुलं जर गाडीला मोठ्या आवाजालन हॉर्न लावून गाडी मोठ्या वेगाने चालवत असतील तर त्यांच्यावर पण योग्य ती कडक कारवाई केली जाईल, तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल. कोणाचीही गयी केली जाणार नाही. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी व जनतेने सहकार्य करावे. यात्रा उत्सवात सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली. तसेच सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच आसाराम गोपळघरे, भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, सामजिक कार्यकर्ते भीमा घोडेराव, उपसरपंच श्रीकांत लोखंड यांनीही आपापली मते व्यक्त केले. तसेच पोलीस प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन यात्रा उत्सव शांततेत पार पडवा अश्या भावना उपस्थित पुढार्यांनी व्यक्त केल्या तसेच जातीभेद किंवा कोणताही भेदभाव न करता सर्वधर्मसमभाव अशी यात्रा उत्सव साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.
No comments:
Post a Comment