पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३ मार्च
जामखेड शहरातून चोरी गेलेली मोटारसायकल अवघ्या दोन दिवसात शोधून मोटारसायकल व मोटारसायकल चोरास अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले असून. औरंगाबाद येथून अटक केलेल्या हिंगोली जिल्ह्य़ातील चोरास जामखेड न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ :०० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत जामखेड पोलीस स्टेशन समोरील गोडाऊन गल्ली, शकुंतला निवास येथे राहणाऱ्या अविनाश शिवमूर्ती पवार (वय ३६) यांची सुमारे ३५, ००० रुपये किमतीची काळे रंगाची होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH 16 CN 0209 ही जामखेड कर्जत रोड विठाई मंगल कार्यालयासमोरून चोरी गेली होती. यानुसार गाडीचे मालक अविनाश शिवमूर्ती पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे यांनी घटनेचा तपास करत अवघ्या दोन दिवसात मोटारसायकल व मोटारसायकलचोर तुकाराम लक्ष्मण पवार रा.चिंचोली ता. कलमनुरी जि.हिंगोली यांस औरंगाबाद येथुन ताब्यात घेऊन जामखेड येथे आणले व त्यास जामखेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवस पोलिस कस्टडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.
या दमदार कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या कामाचा अनुभव बदली झाल्यानंतरही जामखेडकरांना अनुभवाला मिळाला आहे. यावरून पो. नि. संभाजीराव गायकवाड यांचे जामखेडवाशियांशी किती ऋणानुबंध जुळले आहेत याचा प्रत्यय येतो.
No comments:
Post a Comment