महाराष्ट्रात ६०% लोकसंख्या ही ४० वर्षाखालील असून राज्याचे एखादे धोरण निश्चित करताना त्यात युवांचा सहभाग हा खूप कमी प्रमाणात दिसतो. तरुणांसाठी कोणतेही व्यासपीठ नाही जिथे शासन आणि धोरण निर्मिती प्रक्रियेत ते अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्यातील युवांसाठी महाराष्ट्र व्हिजन फोरम सुरू करून त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. ज्या माध्यमातून ही तरुण मंडळी आपल्या अपेक्षा मतदानाच्या स्वरूपात मांडू शकतात.
या अराजकीय युवा केंद्रित सामाजिक उपक्रमात गेल्या २ महिन्यात ५.५ लाखांहून अधिक युवांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ७-८ महाविद्यालयात जाऊन युवकांशी साधलेला संवाद आणि पहिल्या दिवसापासून राज्यातील युवांनी या उपक्रमाला दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद यासह एकूणच महाराष्ट्र व्हिजन फोरम हा उपक्रम म्हणजे काय? आणि या मागचा मूळ हेतू काय? याबाबत सविस्तरपणे रोहित पवार यांनी माहिती दिली आहे तसेच या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा ७५ वा वर्धापन दिन म्हणजेच अमृत महोत्सव २०३५ मध्ये साजरा होणार आहे. तोपर्यंत शाश्वत विकास साधण्यायोग्य असं धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील संबंध युवक युवतींना एकत्र आणून महाराष्ट्राच्या भविष्याच्या धोरण निर्मितीत सहभागी करून घेण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र व्हिजन फोरम ही एक प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे. ज्याला संपूर्ण राज्यभरातील असंख्य युवांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ मंडळी देखील मार्गदर्शक म्हणून या उपक्रमात जोडले गेले आहेत हे विशेष.
No comments:
Post a Comment