पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२०मार्च
आमदार प्रा.राम शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. याला मोठे यश मिळाले आहे. सरकारकडून तब्बल २६ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत - जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. या पाठपुराव्याला आता मोठे यश येताना दिसत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील ८ रस्त्यांसाठी तब्बल २६ कोटींच्या निधीस सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष योजना ५०५४ (०३) अंतर्गत ही कामे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मंजुर झाली आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी साडे अकरा कोटी तर कर्जत तालुक्यासाठी साडे चौदा कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
आ. प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पात मंजुर झालेली कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामे खालीलप्रमाणे
1) करमाळा - नान्नज- जामखेड- साकत - पाटोदा रस्ता रामा 56 किमी 19/800 ते 20/400 मध्ये सुधारणा करणे (भाग जवळा ते बोर्ला व किमी 28 /00 ते 29/00 भाग धोंडपारगाव ते राजेवाडी ) या कामासाठी 1.5 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
2) राममा 561 ते आष्टी - जामगाव- डोणगांव- अरणगांव- फक्राबाद- बावी - नान्नज- सोनेगाव- खर्डा रस्ता रामा 409 13/600 ते 14/600 मध्ये सुधारणा करणे (भाग अरणगाव) या कामासाठी 1 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
3) राममा 548 ते पाटोदा - कुसडगाव- आपटी - पिंपळगाव उंडा - सोनेगाव रस्ता रामा 408 किमी 0/00 ते 1/500 मध्ये सुधारणा करणे ( भाग राममा 548 D ते कुसडगाव) या कामासाठी 1 कोटी 70 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
4) राममा 548 ते पाटोदा - कुसडगाव- आपटी - पिंपळगाव उंडा - सोनेगाव रस्ता रामा 408 किमी 16/00 ते 18/00 मध्ये सुधारणा करणे ( भाग घोडेगाव ते पिंपळगाव उंडा ) या कामासाठी 2 कोटीचा निधी मंजुर झाला आहे.
5) राममा 548 ते पाटोदा - कुसडगाव- आपटी - पिंपळगाव उंडा - सोनेगाव रस्ता रामा 408 किमी 24 /600 ते 30/600 मध्ये सुधारणा करणे ( भाग पिंपळगाव उंडा ते सोनेगाव) या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.
6) बनपिंप्री तालुका हद्द ते निमगाव गांगर्डा - बेलगाव- कोकणगाव- रवळगाव - गुरवपिंप्री - चांदे खुर्द - वालवड - रेहकुरी - नांदगाव - दुरगाव- पिंपळवाडी - बारडगाव दगडी - बारडगाव सुद्रिक रामा 68 रस्ता रामा 407 किमी 21/ 00 ते 26/800 सुधारणा करणे ( भाग प्रजिमा 100 रोटेवाडी ते गुरवपिंप्री ) या कामासाठी 6 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.
7) कोपरगांव- राहुरी - अहमदनगर- करमाळा रोड प्ररामा 08 (रा.म.म 516 अ) किमी 49/400 ते 53/400 मध्ये सुधारणा करणे ( भाग मिरजगाव गावातील लांबी) या कामासाठी 5 कोटीचा निधी मंजुर झाला आहे.
8) कर्जत - कोरेगाव - चापडगांव- चोंडी - हळगाव- रस्ता रामा 405 किमी 15/200 ते 17/00 मध्ये सुधारणा करणे ( भाग चापडगांव गावाजवळील लांबी) या कामासाठी 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजुर झाला आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून गेल्या महिनाभरापासून मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरीव निधी मंजुर होऊ लागला आहे. यापुर्वी मतदारसंघात ५१ कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजुर झाला होता, आता आणखीन २६ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठ्या प्रमाणात कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत, त्या कामांना निधी द्यावी अशी मागणी या भागातील जनतेकडून सातत्याने होत होती, या मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा हाती घेतला होता. याला आता मोठे यश आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांच्या कामांसाठी २६ कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामुळे या भागातील जनतेकडून सरकारचे आणि आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.
No comments:
Post a Comment