पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ एप्रिल
कर्जत-जामखेड मतदारसंघातील अंधारात असलेल्या तांडा वस्त्यांसाठी विजेची सोय व्हावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे. वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 कामांसाठी 100 लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील तांडा वस्त्या प्रकाशमान होणार आहेत.सदर निधी मंजुरीचा शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आज 31 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आला आहे.
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या तांडा यांच्या सुधारणेसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 कामांची जिल्हा स्तरीय समितीने सरकारकडे शिफारस केली होती. आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील 25 कामांचा वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेत समावेश होऊन तब्बल 1 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचा झंझावात मतदारसंघात निर्माण केला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघात 140 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील 22 तांडा वस्त्यांवर विजेची समस्या गंभीर होती. या वस्त्यांवरील अंधार दुर करण्याबरोबर या वस्त्यांवरील नागरिकांच्या आयुष्यातील अंधार दुर करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार पाठपुरावा केला होता. त्याला मोठे यश मिळाले आहे. 22 तांडा वस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी भरीव निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील तांडा वस्त्या प्रकाशमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील तांडा वस्त्यांसाठी वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याने जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून मंजुर झालेली कामे आणि निधी खालील प्रमाणे
1) कर्जत - बारडगाव सुद्रिक - खताळवस्ती - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 5 लाख रूपये
2) कर्जत - राक्षसवाडी बुद्रुक - श्रीरामवस्ती गावठाण - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 5 लाख रूपये
3) कर्जत - बारडगाव दगडी - बेलवंडी गावठाण - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 3 लाख रूपये
4) कर्जत- गणेशवाडी - पांडुळेवस्ती - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 2 लाख रूपये
5) कर्जत- गणेशवाडी - दातीरवस्ती - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 2 लाख रूपये
6) कर्जत- गणेशवाडी - माळेवाडी - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 2 लाख रूपये
7) कर्जत- चिलवडी - गाडेवस्ती - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 3 लाख रूपये
8) कर्जत- चांदेखुर्द - शिंगाडे, गावडेवस्ती - वीजपुरवठा करणे - मंजुर निधी - 4 लाख रूपये
9) जामखेड- कवडगाव- सांगळे गितेवस्ती - वीज पुरवठा करणे - 4 लाख रूपये
10) जामखेड- पिंपरखेड - कारंडेवस्ती - वीज पुरवठा करणे - 4 लाख रूपये
11) जामखेड- धानोरा - धानोरा गावठाण - वीज पुरवठा करणे - 2 लाख रूपये
12) जामखेड- धानोरा - फुंदे मिसाळ जायभायवस्ती - वीज पुरवठा करणे - 5 लाख रूपये
13) जामखेड- अरणगाव - धनगरवस्ती - वीज पुरवठा करणे - 7 लाख रूपये
14) जामखेड- अरणगाव - वंजारवस्ती - वीज पुरवठा करणे - 6 लाख रूपये
15) जामखेड- खर्डा - गितेवाडी - वीज पुरवठा करणे - 3 लाख रूपये
16) जामखेड- खर्डा - पांढरेवाडी - वीज पुरवठा करणे - 3 लाख रूपये
17) जामखेड- खर्डा - वडारवाडा - वीज पुरवठा करणे - 2 लाख रूपये
18) जामखेड- खर्डा - रजपूत भामटा - वीज पुरवठा करणे - 6 लाख रूपये
19) जामखेड- खर्डा - दरडवाडी - वीज पुरवठा करणे - 5 लाख रूपये
20) जामखेड- मुंजेवाडी - जाधववस्ती - वीज पुरवठा करणे - 5 लाख रूपये
21) जामखेड- वाकी - कोळेकरवस्ती- वीज पुरवठा करणे - 4 लाख रूपये
22) कर्जत - तळवाडी - श्रीरामवस्ती - अंतर्गत क्राँकीट रस्ता - 5 लाख रूपये
23) कर्जत- रूईगव्हाण- शिववस्ती - रस्ता तयार करणे - 5 लक्ष रूपये
24) कर्जत- थेरगाव - सिध्देश्वर वाडी - वीज पुरवठा करणे - 5 लक्ष रूपये
25) जामखेड- धामणगाव- सोनारवाडा वस्ती - रस्ता तयार करणे - 3 लक्ष रूपये
चौकट
कर्जत-जामखेड मतदारसंघातील तांडा वस्त्यांचा विकास व्हावा यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो, यापुर्वी मंत्री असताना अनेक वस्त्यांना मोठा निधी दिला आहे. मतदारसंघातील तांडा वस्त्यांचा अंधार दुर व्हावा, अशी मागणी आल्यानंतर तात्काळ यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. सरकारने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून यासाठी भरीव निधी मंजुर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मनापासुन आभार !
- आमदार प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment