पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६एप्रिल
जामखेड तालुक्यातील मिलिंदनगर हे आंबेडकर चळवळीचे माहेरघर परंतु मध्यंतरी कोरोना काळामुळे गेले पाच वर्ष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती छोटयाखाणी साजरी केली जायची. परंतु मिलिंद नगर मधील सर्व तरुणांना आपआपसातील गट तट विसरुन एकत्र करुन भिमटोला यंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांनी सर्व तळागाळातली लहान मोठ्यांना विविध धर्मातील लोकांना एकत्र आणुन परत एकदा भिमाचा किल्ला मजबूत केला.
जामखेड शहरामध्ये समस्त भिमसैनिकाने सामुहिक जयंतीमध्ये मिलींद शिंदे यांना आणले होते व संध्याताई सोनवणे यांनी आनंद शिंदे या कार्यक्रमाच्या आयोजक होत्या. दोन्ही कार्यक्रम यशस्वी करणे मिलिंदनगर जयंती महोत्सव समितीवर मोठे आव्हान होते. परंतु मिलिंदनगरच्या सर्व कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नाने भव्यदिव्य मिरवणूकीचे आयोजन केले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमातून लक्ष वेदुन घेताना दिसत होते. पांढऱ्याशुभ्र साड्या, डोक्यावर फेटे, वयोवृद्ध, तरुण, भिमसैनिकांची तुफान गर्दी ही मिलिंद नगरची एकजुट भिमजयंतीच्या माध्यमातून मिलिंदनगरने परत एकदा भिमाचा किल्ला मजबूत केल्याचे चित्र पहायला मिळाले.आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या जामखेड शहरातील मिलिंदनगर जंयती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षीची आंबेडकर जयंतीनिमित्त जामखेड शहरामध्ये भव्य दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. भिमटोला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतुन व मिलिंदनगर जयंती महोत्सव समितीचे सदस्य यामध्ये वंतितचे जि.उपाध्यक्ष योगेश सदाफुले, वंचितचे ता.अध्यक्ष अतिष पारवे, मनसे ता.उपाध्यक्ष सनी सदाफुले, वंचिकचे शहराध्यक्ष गणेश घायतडक, दादा मोरे, तुषार शिरोळे, पप्पु सदाफुले,किशोर सदाफुले, छबु ओहाळ, हेंमत घायतडक ,अंकल घायतडक, गौरव घायतडक , संतोष सदाफुले शुभम घायतडक, बिट्टु ओहळ, उमेद शेख, बिनिप आखाडे ,राम गायकवाड , नयन गायकवाड, अक्षय शिरोळे, यांच्या विशेष प्रयत्नाने जामखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीत बाबासाहेबांच्या घोषणांसह घुमला जय भिमचा नारा यामध्ये लहान मुलांचे लेझिम पथक, हलगी पथक, सनई तुतारी, ढोलीबाजा, डिजे साऊंड सिस्टीम अशा विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment