पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६एप्रिल
जामखेड तालुक्यातील साकत गावचे आराध्य दैवत श्री साकेश्वर महाराज यांची सोमवारी मोठी यात्रा भरली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात थाटात संपन्न झाली .श्री साकेश्वर महाराज हे साकत गावचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. शनीचे राक्षसभुवन येथून गोदावरी नदीचे जल श्री साकेश्वर महाराज देवाला अभिषेक घालण्यासाठी अनवाणी पायांनी कावडीधारक आणतात दोनशे ते अडीचशे लोक येत असतात. साकत ते राक्षसभुवन या गोदावरी नदी वरुण दोनशे ते अडीचशे लोक अनवाणी पायांनी चालत जाऊन व गोदावरी नदीचे जल चालत आणतात तसेच कावडीधारकांची वाजत गाजत, डीजेच्या गाण्यावर व लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली होती. श्री साकेश्वर महाराज देवाला जलाभिषेक केला. नंतर पाच वाजता पेढेची शेरणी वाटप झाली. सायंकाळी नृत्यांगनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी केली होती. श्री साकेश्वर देवाची पालखी रात्री बारा वाजता संपूर्ण गावात फिरवली. पालखीपुढे देवाचा नंदी दिमाखात चालत होता. गावातील लहान थोर मंडळींच्या देवाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. गावच्या यात्रेसाठी बाहेर गावी नोकरी काम धंदा निमित्ताने बाहेर गावी असलेले सर्व लोकांनी यात्रेला हजेरी लावली होती.
श्री साकेश्वर देवाचा नवस बोलण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी यात्रेला मोठ्या प्रमाणात लोक येत असतात
No comments:
Post a Comment