पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३१मे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला काल दि. ३० रोजी चोंडी आ. रोहित पवार, आहिल्याबाई होळकरांचे वंशज अक्षय शिंदे व ग्रामस्थांच्या वतीने महापूजा आणि जलाभिषेक, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांनी आहिल्याबाई होळकरांचा २९८ वा जयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त काल दि. ३० मे रोजी रात्री चोंडी या त्यांच्या जन्मगावी देशातील क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचं पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २९८ व्या जयंतीनिमित्त २९८ फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.
या बरोबरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी असलेल्या उज्जैन येथून आणलेल्या हत्तीचीही विधीवत पूजा करण्यात आली.
तसेच चोंडी गावातील महादेव मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक यावर नागरिकांनी आणि आपण सर्वांनी मिळून डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशा प्रकारे पहिल्यांदाच रात्री १२ वाजता सर्वांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करता आली, याचं आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
याबरोबरच चोंडी येथील सीना नदीपात्रात थ्रीडी कलाकार उद्देश पघळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४१ हजार पणत्यांपासून (५० बाय ५० साईझ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली. तसेच श्री क्षेत्र आळंदी येथील ह.भ.प. गडदे महाराज यांनी किर्तन सेवा बजावली. याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
No comments:
Post a Comment