पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ मे
याबाबत सविस्तर असे की, दि. २२ मे रोजी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की. नेवासा तालुक्यातील
माळीचिंचोरा फाटा येथे आकाश संजय पवार हा बेकायदेशीर गावठी कट्टा व काडतुसे जवळ बाळगुन फिरत आहे. यावरून पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी तातडीने आदेश देत पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस कॉन्सटेबल सुमित करंजकर, पोलीस कॉन्सटेबल शाम गुंजाळ, पोलीस कॉन्सटेबल गणेश ईथापे व दोन पंच असे सर्वजण नेवासा पोस्टे येथून खाजगी वाहनाने रवाना केले. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार माळीचिंचोरा फाटा येथे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता, सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास
एक व्यक्ती संशयीत रित्या येथे फिरत असताना दिसल्याने त्या व्यक्तीजवळ जावुन त्याला पोलीसांनी घेराव घातला व त्याला हटकले असता, त्याला हे पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने त्याच्याजवळ असलेला उजव्या कमरेला लावलेला गावठी कट्टा दाखवुन तो पोलीसांना भिती दाखवु लागला. त्याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल गणेश ईथापेंशह दोघांनी त्याच्या अंगावर झडप घालुन त्याला पकडले. व ताब्यात घेऊन त्याचेकडे सविस्तर चौकशी केली असता. आकाश संजय पवार, वय २३ वर्षे, रा. ब्रम्हतळे / ब्रम्हनगर नागरदेवळे भिंगार ता. जि. अहमदनगर असे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा ( पिस्टल ) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे, एक मोबाईल व त्याची वापरती एक मोटारसायकल असा मुद्देमाल मिळुन आलेला आहे.
सदर आरोपीस नेवासा पोलीस स्टेशन येथे आणुन त्याच्याविरुध्द पोलीस कर्मचारी शाम बाबासाहेब गुंजाळ दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं 556/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर (श्रीरामपूर), उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, ( शेवगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, पोलीस उप निरीक्षक, समाधान भाटेवाल, महिला पोलीस नाईक सविता उंदरे, पोलीस काॅन्स्टेबल सुमित करंजकर, शाम गुंजाळ, गणेश ईथापे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment