पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २ जून
जामखेड शहर व तालुक्यातील लोकवस्तीमधून जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिन्यांवर तातडीने प्लास्टिक पाईप, किंवा पट्ट्या बसवून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात अन्यथा विज वितरण कार्यालयापुढे तिव्र अंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक युवा कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी दिला आहे.
या बाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरासह तालुक्यातील विविध गावांच्या लोकवस्त्यामधून व घरावरून विजेच्या मुख्य वाहिन्या गेलेल्या आहेत. या विद्युत वाहिन्याचे कामे खूप वर्षांपूर्वी
झालेली आहेत. तदनंतर मानवी शहर वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच ऊन, वारा, पाऊस यामुळे विद्युत खांबावरील ताण व विद्युत वाहिन्यांची झालेली झीज याने बऱ्याच ठिकाणी नागरीकांचे व शेतकऱ्यांचे जीवीत हानीसहीत नुकसान होत आहे.
त्यामुळे विद्युत वाहिन्यांच्या तारा अचानक तुटत आहेत, खांबं सुद्धा अचानक कोलमडत आहेत. काही ठिकाणी डि. पी. चे फ्युजचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत. काही ठिकाणी उघडेच राहिलेले आहेत.
दरम्यान जामखेड शहरामध्ये जुन्या डि.जे. हॉटेलच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरावरून मेन लाईन गेलेली आहे. याच भागात दि. २६/०५/२०२३ रोजी कु. ओमी मस्कर (वय ९ वर्षे) रा. वरकुटे ता.करमाळा जि.सोलापूर येथील रहिवासी आहे. ही आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्नानिमित्त आली असता, घराच्या छतावर खेळत असताना तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईनचा धक्का बसला. त्यात तिचा मृत्यु झाला. अशा घटना पुर्वी सुद्धा अनेक वेळेस झालेल्या आहेत.
यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत वाहिन्यावर तारेवर पाईप, पट्ट्या तसेच विद्युत पोलचे ताण आवळून संरक्षण होईल व मानवी जीवीत हानी होणार नाही. अशी लोकवस्तीमधील लोकवर्दळ असलेल्या भागात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात ही नम्र विनंती, अन्यथा तसे न झाल्यास होणाऱ्या जीवीत हानीस व नुकसानीस आपल्याला जबाबदार धरले जाईल. असेही निवेदनात म्हटले, तसेच विज वितरणाच्या जामखेड कार्यालयासमोर अंदोलन केले जाईल केले जाईल असा इशारा स्वप्निल खाडे यांनी दिला आहे.
चौकट
सदर मागण्यांबाबत दिलेल्या अंदोलनाची दखल घेऊन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी विज वितरण कंपनीस योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment