पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १ जून
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या नायगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ- सुरेखा शिवाजी ससाणे यांना
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत याच वर्षी सुरू करण्यात आलेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य घराघरात पोहचावे व त्यातून महिलांनी आदर्श घेऊन आहिल्याबाई होळकर यांच्या प्रमाणे समाजातसाठी योगदान द्यावे यासाठी आपल्या गावात महिला व बालकल्याण या क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करावे यासाठी ज्यांनी पुर्वीच या क्षेत्रात काम केले आहे अश्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित ठरवले आहे.
त्यानुसार नायगावच्या माजी सरपंच सौ. सुरेखा शिवाजी ससाणे यांना सन २०२३-२४ या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. नायगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या वितरण समारंभासाठी सरपंच सौ. सुवर्णा चंद्रकांत उगले, ग्रामसेविक पटेकर मॅडम, पोलिस पाटील विनोद उगले, ग्रामपंचायत सदस्य नितिन ससाणे, मुरकुटे, युवराज उगले, बजिरंग उगले, शिवाजी ससाणे, निलम उगले ,सचिन उगले, आदी मान्यवरांसह नायगाव ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल सौ. सुरेखा शिवाजी ससाणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment