पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-११ जून
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड आज पार पडली. या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणूकीत भाजपचे काकासाहेब तापकीर यांची सभापतीपदी तर अभय पाटील उपसभापती यांनी विजय मिळवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित पवार आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी ९ जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित ९ जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले.
या अटीतटीच्या लढतीमुळे सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज ही निवड प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये भाजप आमदार राम शिंदे गटाने बाजी मारली आहे. निवडणूकीत दोन्ही गटाच्या ९-९ जागा आल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
यावेळी रोहित पवारांची मते फुटल्याने राम शिंदे यांच्या गटाचा सभापती आणि उपसभापती झाले. यावेळी सभापती पदासाठी ९ मतदान तर राष्ट्रवादीचे एक मत बाद झाल्याने भाजपने विजय मिळविला आहे. या निकालाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
No comments:
Post a Comment