पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२२ जून
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर खर्डा ग्रामपंचायतची मासिक सभा गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात आली आहे.काल दि. २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेला एकुण १७ सदस्यांपैकी गणपूर्तीसाठी आवश्यक ९ ऐवजी सातच सदस्यांनी उपस्थिती दर्शविल्याने काल दि. २१ रोजी आयोजित करण्यात आलेली मासिक सभा तहकूब केली असून दि. २६ जून रोजी पुन्हा मासिक सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या खर्डा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे ताब्यात गेली, यावेळी मोठा राजकीय संघर्ष पहावयास मिळला होता. आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्या प्रतिष्ठाही या निवडणुकीत लागल्या होत्या. या सर्व घडामोडीत ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. यामुळे विरोधकांकडून सरपंच संजीवनी पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. याबाबतही उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.
सदर झालेल्या मासिक सभेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खर्डा ग्रामपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मासिक सभा रद्द झाल्याने सरपंच संजीवनी पाटील यांना ग्रामपंचायत च्या संदर्भात बँकेचे व इतर व्यवहार करण्याचा अधिकार त्यामुळे प्रलंबित झाला असल्याने पुढील मासिक सभेपर्यंत हा विषय लांबणीवर पडला असल्याचे दिसत आहे.
खर्डा ग्रामपंचायतच्या सत्ता संघर्षात गावाच्या विकासासंदर्भात पुढील कामे कशा पद्धतीने करायची याबाबत सरपंच सौ. संजीवनी वैजीनाथ पाटील यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment