पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१ जून
जामखेड तालुक्यातील साकत येथे राहणाऱ्या एक नराधम शिक्षकाने तो शिकवत असलेल्या शाळेतील एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेच्या आभ्यासाचे माध्यमातुन तिचेशी स्नॅपचॅट अँपचे माध्यमातून जवळीक साधुन बालकास अर्धनग्न फोटो पाठविण्यास सांगितले. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार करून शिक्षकी पेशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर आरोपी शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर यास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. २६ जून पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
सविस्तर असे की, आपल्या शाळेत शिकत असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन पिडितेस शाळेच्या आभ्यासाचे माध्यमातुन तिचेशी स्नॅपचॅट अँपचे माध्यमातून जवळीक साधुन बालकास अर्धनग्न फोटो पाठविण्यास सांगितले. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून दि.१४ जून २०२३ रोजी दुपारी १४ : ०० वाजताचे सुमारास सदर पिडीत बालिके स जामखेड येथून बीड जिल्ह्य़ातील आष्टी येथील हर्षद लाॅज येथे घेवुन जावून पिडीत बालक हे अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिचेशी बळजबळीने शारीरीक संबंध केले व त्याबाबत कोणाला काही सांगितले तर तिथे अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून यातील आरोपी राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर वय ३० वर्ष रा.साकत, ता. जामखेड याचेवर कलम ३७६ (२) (एफ) (आय) भा.द.वि.सह ४ बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम नुसार बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात पिडीतेबालकाची ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे... या सदराखाली वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील नमुद आरोपीचा शोध घेताच मिळून आल्याने तसेच सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करून मा. सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करून त्यास काल दि.२० जून २०२३ रोजी ११/५४ पा. अटक करण्यात आली आहे.
या शिक्षकाकडून सदर पिडीतेबाबत हा अत्याचार जानेवारी २०२३ ते १४ जून २०२३ दरम्यान घडला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासह मुलींच्या पालकांमध्ये व्देषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात हे प्रकरण सोशल मीडियाच्या स्नॅपचाट या अॅपचा गैरवापर केल्याने घडले असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या हातात मोबाईल देताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment