पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३ जून
पंढरपूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाकारीत सर्व जाती धर्माचे लोक दिंडीत साहभागी होत पाई चालत निघतात.गावा गावातून या पाई निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जाती पाती सोडून एकत्र येतात.याचेच एक प्रतीक म्हणजे जामखेड तालुक्यातील जवळा गावातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखत दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवा घडावी तसेच मुस्लिम समाजाचाही हातभार लागावा या हेतूने पूर्ण दिंडी साठी मस्जिद मध्ये
चहा आणि नाष्ट्यची सोय करत त्यांचे स्वागत केले.सरदवाडी येथील श्री क्षेत्र श्रीराम देवस्थान ट्रस्ट च्या मध्यातून सरदवाडी ते पंढरपूर जामखेड नान्नज, बोर्ले मार्गे जवळा असा मार्ग होता.ह.भ.प तेजेराव महाराज कात्रजकार व ह.भ.प बाळासाहेब महाराज गाडे यांच्या प्रेरणेतून ही दिंडी मार्गस्थ आहे.या वर्षी प्रमाणे येणाऱ्या प्रत्येक वर्षीही मुस्लिम बांधवाने अशीच सेवा आम्ही करणार ते तुम्ही स्वीकारावी अशी विनंती केली .या केलेल्या सेवेबद्दल दिंडीतील सर्व वारकरी मंडळींनी तसेच दिंडी चालक व महाराज यांनी आभार मानले तसेच याच बद्धतीने प्रत्येक वर्षी आम्ही मुस्लिम बांधवांच्या सेवा स्वीकारू असे सांगितले .
No comments:
Post a Comment